Monday, June 9, 2025
Home मराठी सोनाली कुलकर्णी पतीसोबत करतेय सुट्ट्या एंजॉय, सोशल मीडियावर दिली मालदीवची झलक

सोनाली कुलकर्णी पतीसोबत करतेय सुट्ट्या एंजॉय, सोशल मीडियावर दिली मालदीवची झलक

भटकंती करणे हा अनेक कलाकारांचा छंद असतो. शूटिंग, प्रोग्राम यामुळे त्यांना सहसा कुटुंबाला वेळ द्यायला जमत नाही. पण जेव्हा त्यांना वेळ मिळतो तेव्हा ते परिवारासोबत एन्जॉय करताना दिसत असतात. अशातच मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही तिच्या पतीसोबत फिरायला गेली आहे. तिच्या या ट्रिपचा ती भरभरून आनंद घेताना दिसत आहे. तिने याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोनाली ही तिचा पती कुणालसोबत मालदीवमध्ये एन्जॉय करत आहे. तेथील काही फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती अत्यंत आनंदी दिसत आहे. तिने निऑन कलरचा टॉप आणि शॉर्ट पँट परिधान केली आहे. तसेच तिने त्यावर ग्रे कलरचे जॅकेट घातले आहे. ती या फोटोमध्ये अनेक मजेशीर पोझ देताना दिसत आहे. तसेच तिच्यासोबत तिचा पती कुणाल देखील दिसत आहे. ही तिच्या पतीसोबतची तिची दुसरी ट्रिप आहे. लग्नानंतर ते दोघे आफ्रिकेमध्ये हनिमूनला गेले होते. तेथील फोटो देखील सोनालीने शेअर केले होते. (sonalee kulkarni enjoy vacation in maldives with her husbund)

सोनाली आणि कुणालने काही महिन्यांपूर्वी दुबईमध्ये अत्यंत सध्या पद्धतीने लग्न केले आहे. केवळ कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांचा लग्न सोहळा पार पाडला होता. तसेच अचानक लग्न करून तिने तिच्या चाहत्यांना सरप्राईज दिले होते.

सोनाली मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची नायिका आहे. ती अभिनयासोबत उत्कृष्ट डान्स देखील करते. तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘महाराष्ट्राची डान्सिंग क्वीन’ हा रियॅलिटी डान्स शो जज देखील केला आहे. तिने ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी, ‘पोस्टर गर्ल्स’, ‘क्लासमेट’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जिया खान आत्महत्या प्रकरणाची धुरा विशेष सीबीआयच्या हातात; सूरज पांचोली म्हणाला, ‘…मला शिक्षा झालीच पाहिजे’

-करिश्मासोबत नाते तोडून अभिषेकने का केले तीन वर्षांनी मोठी असणाऱ्या ऐश्वर्यासोबत लग्न? कारण ऐकून व्हाल हैराण

-लाजुन लाल झाला शाहिद कपूर, जेव्हा मीराने शेअर केले बेडरूम सिक्रेट; म्हणाली, ‘मला वाटतं तो कंट्रोल…’

हे देखील वाचा