Saturday, June 15, 2024

लाजुन लाल झाला शाहिद कपूर, जेव्हा मीराने शेअर केले बेडरूम सिक्रेट; म्हणाली, ‘मला वाटतं तो कंट्रोल…’

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांच्या जोडीला चाहते खूप प्रेम देतात. दोघेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर गोड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. ज्याप्रकारे चाहते आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात, त्याचप्रमाणे शाहिद – मीराबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. मीरा नेहमीच आपल्या खासगी जीवनाविषयी मुलाखतींमध्ये बोलत असते. एका मुलाखतीमध्ये मीराने चक्क आपल्या बेडरूम जीवनाविषयी काही सिक्रेट शेअर केले आहेत. जेव्हा खासगी जीवनाविषयी शाहीद मीराला प्रश्न विचारले गेले, तेव्हा शाहीद थोडा लाजला. पण मीराने प्रत्येक प्रश्नाचं चटकन उत्तर दिलं. 25 फेब्रुवारी 1981 रोजी शाहिद कपुर याचा जन्म झाला. या निमित्ताने त्याच्या जीवनाविषयी जाणुन घेऊ या…

‘मला वाटतं की तो कंट्रोल फ्रिक आहे’
साल 2015 मध्ये नेहा धूपिया होस्टिंग शो ‘वॉग बीएफएफ’मध्ये शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत आले होते. तेव्हा मुलाखती दरम्यान एक सेगमेंट होता ‘स्केरी स्पाइस’. या सेगमेंटमध्ये मीराला प्रश्न विचारण्यात आला की, “बेडवरती तुमची आवडती पोजिशन कोणती आहे?” हा प्रश्न ऐकून शाहिद थोडा लाजला, पण मीरा लाजली नाही. मीराकडे या प्रश्नाचं उत्तर न देण्याचा पर्याय होता. ती म्हणाली, “मला वाटतं की तो कंट्रोल फ्रिक आहे. तो नेहमी सांगतो की, काय करायचं आहे.” मीराने हे सुध्दा सांगितले की, शाहिद जेव्हा कुटुंबासोबत बसलेला असतो, तेव्हा ती त्याला किस करताना बिलकुल लाजत नाही.

Photo Courtesy : Instagram/mira.kapoor

‘मीरा नेहमीच माझे कपडे घालून झोपी जाते’
या शोमध्ये शाहिदने सांगितले की, मीरा नेहमीच त्याचे कपडे घालून झोपते. याआधी करण जोहरचा शो ‘ कॉफी विथ करण’मध्ये शाहिदने सांगितले होते की, मीरा नेहमीच त्याचे ब्लँकेट उचलून घेऊन जाते आणि तो थंडीमध्ये बिनाकपड्यांचा कुडकुडत राहतो. शाहिदने हे सुध्दा सांगितले की, मीराला तो नेहमीच भितो. कारण जेव्हा टॉयलेट सिट उचलून पुन्हा डाऊन करायचं विसरून जातो, तेव्हा मीरा त्याला खूप खरी खोटी सुनावते. (when mira rajput shahid kapoor shared bedroom secrets on chat show)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता…’च्या दयाबेन यांचा नवीन व्हिडिओ व्हायरल, कुटुंबासोबत दिसल्या अभिनेत्री दिशा वाकाणी

बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध फिल्ममेकरला मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये समन, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

हे देखील वाचा