Thursday, November 21, 2024
Home बॉलीवूड ‘३ इडियट्स’ चित्रपटात काम केल्यानंतर अली फजल खरंच बनला होता डिप्रेशनचा शिकार; ‘हे’ होते कारण

‘३ इडियट्स’ चित्रपटात काम केल्यानंतर अली फजल खरंच बनला होता डिप्रेशनचा शिकार; ‘हे’ होते कारण

‘कामयाब नहीं काबिल बनो,’ हा डायलॉग तर आठवलाचं असेल. का नाही आठवणार बरं? सर्वांच्या आवडत्या ‘3 इडियट्स’ या चित्रपटातील हा डायलॉग आहे. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातील सगळीच पात्र प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटात अली फजलनेही छोटंसं पात्र निभावलं होतं. या चित्रपटात त्याने जॉय लोबोचे पात्र निभावले होते. जो कॉलेज आणि अभ्यासाच्या दडपणाने जीव देतो. या चित्रपटात त्याचे खूप कौतुक झाले होते. परंतु या चित्रपटात काम केल्यानंतर तो खरंच डिप्रेशनमध्ये गेला होता. (3 idiot’s actor Ali fazal told that he faced depression after playing role of joy lobo)

‘3 इडियट्स’ या चित्रपटात शिक्षण प्रक्रियेवर प्रकाश टाकला होता. तसेच या चित्रपटातून संदेश देखील दिला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. चित्रपटातील प्रत्येक पात्राला कौतुकाची थाप मिळाली होती. चित्रपटात अली फजल हा छोट्या पण महत्त्वाच्या भूमिकेत होता. ‘गिव्ह मी सन शाईन’ या गाण्याचे चित्रीकरण त्याच्यावर केले होते. तसेच ‘आल इज वेल’ या गाण्याच्या शेवटी त्याने आत्महत्या केली होती. अलीने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, लोकांचे माहित नाही, पण तो मात्र खरंच डिप्रेशनमध्ये गेला होता.

अली फजलने सांगितले की, “जेव्हा मी 3 इडियट्स या चित्रपटात काम केले, त्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. मी अगदी छोटेसे पात्र निभावले होते. पण माहित आहे का त्यानंतर काय झाले होते? त्यावेळी अनेक डिस्टर्ब करणाऱ्या बातम्या येत होत्या. काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वत:चे नुकसान केले होते. अनेक न्यूज चॅनलमधून मला फोन येत होते की, सर तुम्ही असं पात्र निभावलं होतं ज्याचा परिणाम असा झाला आहे, तर तुम्हाला आता कसे वाटत आहे? मी तिथेच पुरता तुटून गेलो होतो, कारण मी नवीन होतो. त्यावेळी मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होतो.”

या चित्रपटात अली फजल ‘आय क्विट‌’ असं लिहून फाशी घेतो. या चित्रपटानंतर अशा बातम्या समोर आल्या होत्या की, अनेक विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे नुकसान करून घेतले होते.

‘3 इडियट्स’ हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आमिर खानसोबत करीना कपूर, आर माधवन, मोना सिंग, शरमन जोशी यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.


हेही नक्की वाचा-
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी ‘ही’ अभिनेत्री पोहोचली अहमदाबादला; म्हणाली…
खुद्द मोदींनी लिहिलेल्या गरब्याला ‘या’ गायिकेने दिलाय आवाज; पंतप्रधानांनी ट्विट करून मानले आभार

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा