Monday, December 9, 2024
Home मराठी खुद्द मोदींनी लिहिलेल्या गरब्याला ‘या’ गायिकेने दिलाय आवाज; पंतप्रधानांनी ट्विट करून मानले आभार

खुद्द मोदींनी लिहिलेल्या गरब्याला ‘या’ गायिकेने दिलाय आवाज; पंतप्रधानांनी ट्विट करून मानले आभार

रविवारी (14 ऑक्टोबर ) सर्वत्र नवरात्री सण सुरू होत आहे. हा सण मोठ्या थाटात पार पडतो. या सणाला अनेक देवीच्या मंदिरात कार्यक्रम ठेवले जातात. अनेक ठिकाणी लोक एकत्र जमतात आणि खेळ खेळत असतात. अशा वेळी गाणी लावली जातात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.

उद्यापासून पुढील नऊ दिवस ठिकठिकाणी गरबा खेळला जाणार आहे. अशा परिस्थितीत गरबा सादर करण्यासाठी लोकांनी आपल्या गाण्यांची यादीही तयार केली आहे. दरम्यान, जॅकी भगनानीच्या डायनॅमिक म्युझिक लेबल जस्ट म्युझिकने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi )यांनी लिहिलेल्या गरबा गाण्यावर आधारित एक म्युझिक व्हिडिओ युटूबवर रिलीज करण्यात आले आहे.

 अभिनेता जॅकी भगनानीच्या मते, हे गाणे नवरात्रीच्या सणासाठी एक वेगळे वातावरण निर्माण करत आहे. हा गरबा ट्रॅक या उत्सवाच्या रंगात रंगला असून हे गाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कवितेपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी लिहिलेले हे गाणे नवरात्रीच्या उत्सवाविषयी बोलते, जे विविध राज्यांतील लोकांना त्यांच्या संस्कृती आणि परंपरा आत्मसात करून एकत्र आणते. हे गाणे ध्वनी भानुशालीने गायले आहे आणि तनिष्क बागचीने संगीत दिले आहे.

या गाण्याबद्दल बोलताना जॅकी भगनानी म्हणाला, ‘माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या उल्लेखनीय संगीत प्रकल्पाचा एक भाग होणे हा माझ्यासाठीसाठी खूप अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. ‘गारबो’ गाण्यात आपली सांस्कृतिक आणि नवरात्रीची भावना पाहायला मिळते. यासोबतच या गाण्यातील संगीताची ताकदही तुम्हाला कळेल.

ध्वनी भानुशालीला टॅग करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केले आहेत. त्यांनी ट्विट करताना लिहिले की, ‘गरबाच्या या सुंदर सादरीकरणासाठी धन्यवाद, जे मी वर्षांपूर्वी लिहिले होते. त्यातून अनेक आठवणी जाग्या होतात. मी अनेक वर्षांपासून काहीही लिहिले नाही, पण गेल्या काही दिवसांत मी एक नवीन गरबा लिहू शकलो, जो मी नवरात्रीच्या काळात शेअर करेन.” त्यांच्या या गाण्याला काही तासांत 7 लाखांहून अधिक लाईक आल्या आहेत. (Written by Modi himself Garbya is sung by Dhvani Bhanushali and composed by Tanishk Bagchi)

आधिक वाचा-
राखीला खावी लागणारा तुरुंगाची हवा? ‘या’ अभिनेत्रीने नाना पाटेकर यांच्यावरही केले गंभीर आरोप
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी ‘ही’ अभिनेत्री पोहोचली अहमदाबादला; म्हणाली…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा