Saturday, May 23, 2026
Home अन्य करीना कपूरच्या ‘दुपट्टा मेरा’ गाण्यावर तीन लहान मुलींचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल

करीना कपूरच्या ‘दुपट्टा मेरा’ गाण्यावर तीन लहान मुलींचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल

तुमच्यात प्रतिभा असेल तर सोशल मीडिया तुमच्यासाठी आणि तुमच्यात असणारी प्रतिभा जगासमोर आणण्यासाठी उत्तम माध्यम आणि पर्याय आहे. हे माध्यम तुम्हाला क्षणात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवते आणि लोकांना तुमची दखल घ्यायला लावते. याच सोशल मीडियावर लोकप्रिय आणि प्रसिद्ध झालेले अनेक कलाकार हिंदी सिने इंडस्ट्रीमध्ये किंवा इतर विविध क्षेत्रांमध्ये वावरताना आपल्याला दिसत आहेत. अनेक असे लोकं आहेत, ज्यांना याच सोशल मीडियामुळे जगण्याची दिशा आणि करिअरचा मार्ग मिळाला आहे.

रोज नवनवीन असंख्य व्हिडिओ या सोशल मीडियावर येत असतात आणि व्हायरल होत असतात. मात्र यातलेच काही मोजके व्हिडिओ सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेत चर्चांमध्ये येतात. सध्या असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, या व्हिडिओमध्ये तीन लहान लहान मुली ‘दुपट्टा मेरा’ या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये नाचताना दिसणाऱ्या तीन मुली अतिशय गरीब असून, त्यांच्या मागे झोपडपट्टी दिसत आहे. या व्हिडिओ या मुली मोठ्या ग्रेसफुली आणि अतिशय धमाकेदार डान्स करत आहे. सलवार कुर्ता घालून डान्स करणाऱ्या या मुली सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनल्या आहेत. अतिशय उत्तम आणि मुरलेल्या डान्ससारख्या डान्स करत आहेत.

उदय सिंग नावाच्या एका यूजरने त्याच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. उदय सिंग स्वतः एक उत्तम डान्सर असून, त्यांनी हा व्हिडिओ शूट करत शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून, असंख्य लोकं हा व्हिडिओ शेअर करत आहेत. या मुलींचा डान्स पाहून व्हिडिओ पाहणारे सर्वच लोकं आश्चर्यचकित झाले असून, या मुलींचे भरभरून कौतुक देखील होत आहेत.

या व्हिडिओवर कमेंट्स करताना एकाने लिहिले, “खूपच अवघड डान्स आहे.” एकाने लिहिले, “या मुलींना देव नेहमीच यश देवो.” काहींनी त्यांना खूप प्रेम दिले आहे, तर काहींनी त्यांना खूप आशीर्वाद दिले आहेत. करीना कपूरचे हे ‘दुपट्टा मेरा’ गाणे २००१ साली आलेल्या ‘मुझे कुछ कहना है’ सिनेमातील आहे. या चित्रपटात करीना कपूरसोबत तुषार कपूर मुख्य भूमिकेत होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी केला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा पार

-अरेरे! प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी लीक झाला ‘सूर्यवंशी’; निर्मात्यांमध्ये काळजीचे वातावरण

-‘सूर्यवंशी’ चित्रपटातील नवीन गाणं रिलीझ, ११ वर्षांनी पाहायला मिळाला कॅटरिना आणि अक्षयचा रोमँटिक अंदाज

हे देखील वाचा