Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड लग्नाला ३० वर्षे पूर्ण; ‘माझ्याशी लग्न करशील का’, म्हणून शाहरुखने ठोकली होती धूम; वाचा तो किस्सा

लग्नाला ३० वर्षे पूर्ण; ‘माझ्याशी लग्न करशील का’, म्हणून शाहरुखने ठोकली होती धूम; वाचा तो किस्सा

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि गौरी खान हे दोघे त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. क्रूझ पार्टीत त्यांचा मुलगा आर्यन खान हा अं’मली पदार्थांचे सेवन केल्याच्या आणि देवाण-घेवाण केल्याच्या आरोपाखाली दोन आठवड्यांपासून आर्थर कारागृहात बंद आहे. अनेक प्रयत्न करून देखील त्याला जामीन मिळत नाहीये. अशातच शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या लग्नाला सोमवारी (२५ ऑक्टोबर) रोजी ३० वर्ष पूर्ण झाले आहेत. २५ ऑक्टोबर १९९१ साली दोघांचे लग्न झाले. त्यांच्या प्रेम कहाणीचे किस्से खूप लोकप्रिय आहेत. परंतू तुम्हाला माहित आहे का , चित्रपटात रोमान्सचे धडे गिरवणाऱ्या शाहरुखने गौरीला कशाप्रकारे प्रपोझ केले होते. चला तर जाणून घेऊया त्यांचा ३० वर्षाच्या प्रेमाचा प्रवास…

शाहरुख आणि गौरीच्या पहिली भेटीमागे एक कहाणी आहे. १९८४ मध्ये दिल्लीमध्ये एका पार्टीत १८ वर्षाच्या शाहरुखने पहिल्यांदा गौरीला पाहिले होते. गौरी दुसऱ्या कोणत्यातरी मुलासोबत डान्स करत होती. शाहरुख खूपच लाजाळू असल्याने गौरीला डान्ससाठी विचारायला त्याची काही हिम्मत झाली नाही. त्यानंतर त्याने खूप हिमतीने गौरीशी बोलायचा प्रयत्न केला. परंतु तेव्हा गौरीने हे सांगून त्याला टाळले की, ती तिच्या बॉयफ्रेंडची वाट बघत आहे. (30 years of marriage shahrukh’s heart was broken after seeing gauri with a handsome boy at the party)

यानंतर त्यांच्या भेटीचे अनेक प्रसंग आले. शाहरुखला गौरी मनातून खूप आवडली होती. परंतु त्याने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही. एके दिवशी शाहरुख गौरीला सोडवायला तिच्या घरी गेला होता. तेव्हा ती गाडीवरून खाली उतरताना शाहरुखने गौरीला विचारले की, “माझ्याशी लग्न करशील का?” यानंतर गौरीचे उत्तर ऐकण्याआधीच तेथून निघून गेला.

त्यानंतर त्यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली. परंतु लग्न करताना त्यांच्यात धर्म मध्ये आला होता. ते दोघेही वेगवेगळ्या धर्माचे आहेत. त्यांच्या घरच्यांना मनवण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले. शेवटी ते घरच्यांना मनवण्यात यशस्वी झाले. परंतू त्यांना एकदा नाहीतर दोनवेळा लग्न करावे लागले होते. गौरी आणि शाहरुखने हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही पद्धतीने लग्न केले. त्यावेळी गौरीचे नाव आयशा असे ठेवले होते.

गौरीचा जन्म एका आर्मी कुटुंबात झाला आहे. तिचे वडील आर्मी कर्नल होते, त्यांचे नाव रमेश चंद्र छिब्बर होते. तिचा जन्म १९७० मध्ये झाला आहे. शाहरुख खान आणि गौरीमध्ये पाच वर्षाचे अंतर आहे. शाहरुख तिच्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय वेळ आलीय! किंग खानची पत्नी गौरीचा मोठा निर्णय; आर्यन खानला जामीन मिळत नाही, तोपर्यंत…

-आर्यन खानच्या चिंतेत शाहरुख आणि गौरी झाले हतबल, त्याला सोडवण्यासाठी करताय शर्थीचे प्रयत्न

-शाहरुख खानची पत्नी गौरी खानने स्वत: कमवलीय कोटींची संपत्ती, ‘या’ कलेत आहे पारंगत

हे देखील वाचा