काय वेळ आलीय! किंग खानची पत्नी गौरीचा मोठा निर्णय; आर्यन खानला जामीन मिळत नाही, तोपर्यंत…

सामान्य व्यक्तींपासून ते दिग्गज कलाकारांपर्यंत प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे समस्यांचा सामना करावा लागतो. आता असेच काहीसे बॉलिवूड किंग खान म्हणजेच शाहरुख खानसोबत घडले आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खान अं’मली पदार्थ प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या अटकेमुळे शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी यावेळी खूपच कठीण काळातून जात आहेत. अशातच मोठी बातमी समोर आली आहे की, जोपर्यंत आर्यनला जामीन मिळत नाही, तोपर्यंत शाहरुखचे कुटुंब घरात कोणताही सण साजरा करण्याच्या मूडमध्ये नाही.

गौरीने कर्मचाऱ्यांनी दिली मिठाई न बनवण्याची सूचना
माध्यमांतील वृत्तानुसार, गौरीने ‘मन्नत’मधील आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की, जोपर्यंत आर्यन घरी येणार नाही, तोपर्यंत घरात कोणतीही मिठाई बनवली जाणार नाही. असे वृत्त आहे की, गौरीला जेव्हा समजले की, दुपारच्या जेवणासाठी कर्मचारी किचनमध्ये खीर बनवत होते, तेव्हा तिने त्यांना थांबवले आणि आर्यनची सुटका होईपर्यंत कोणतीही मिठाई न बनण्याची सूचना दिली आहे. (King Khan Wife Gauri Khan Entire Family Are Not In The Mood To Celebrate The Festivities Till Son Aryan Khan Gets Bail)

View this post on Instagram

A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

या वृत्तामध्ये पुढे असेही म्हटले आहे की, गौरी आपला मुलगा अटक झाल्याने खूपच चिंतेत आहे. ती सातत्याने त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. दुसरीकडे शाहरुखने इंडस्ट्रीतील आपल्या मित्रांना सांगितले आहे की, या कठीण काळात ‘मन्नत’वर येऊ नये. शाहरुख सध्या फोनमार्फत आपल्या सहकलाकारांच्या संपर्कात आहे.

गौरीने ७ ऑक्टोबरला सोडले साखर खाणे
यापूर्वी एका वृत्तामध्ये असे म्हटले गेले होते की, गौरीने नवरात्रीच्या सणादरम्यान मुलासाठी सतत प्रार्थना केली आहे. असेही म्हटले आहे की, ७ ऑक्टोबरला नवरात्री सुरू झाल्यानंतर तिने साखर खाणेही सोडले आहे. ११ ऑक्टोबरला शाहरुख आणि गौरीने आर्यनसाठी ४५०० रुपयांची मनी ऑर्डरही पाठवली होती.

तुरुंगात एका कैद्याला केवळ इतकेच रुपये ठेवण्याची परवानगी आहे. या रुपयांमार्फत आर्यनने तुरुंगातील कँटीनमधून जेवणाचे सामान घेऊन ठेवले आहे. कारण त्याला तुरुंगातील जेवण आवड नाहीये. शाहरुख आणि गौरीने नुकतेच तुरुंगातील व्हिडिओ कॉल सुविधेमार्फत आर्यनशी १० मिनिटांपर्यंत चर्चा केली होती. कारण कोव्हिड- १९मुळे त्याला भेटण्याची परवानगी नाहीये.

आर्यनच्या जामीनावर २० ऑक्टोबरला होणार निर्णय
क्रूझ अं’मली पदार्थ प्रकरणात अटक झालेला आर्यन सध्या मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आहे. मुंबईच्या एनडीपीएस न्यायालयाने १४ ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीनावरील निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० ऑक्टोबरला होणार आहे.

आर्यनसोबत अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचासह इतर आरोपींनाही २० ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातच राहावे लागणार आहे. सत्र न्यायालयाद्वारे २० ऑक्टोबरलाच आर्यनसह इतर आरोपींच्या जामीन अर्जावर निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत आर्यनला तुरुंगातच राहावे लागेल. आर्यनला तुरुंगात कैदी नंबर ९५६ देण्यात आला आहे.

आर्यनला ८ ऑक्टोबरला पाठवले होते आर्थर रोड तुरुंगात
खरं तर ८ ऑक्टोबरला आर्यनसह इतर आरोपींना आर्थर रोड तुरुंगात पाठवण्यात आले होते. १४ ऑक्टोबरला आर्यनसह इतर पाच आरोपींना क्वारंटाईन सेलमधून कॉमन सेलमध्ये शिफ्ट करण्यात आले होते.

आर्यन खानला २ ऑक्टोबर, २०२१ रोजी मुंबईत क्रूझवर सुरू असलेल्या अं’मली पदार्थांच्या पार्टीत छापा मारल्यानंतर एनसीबीने अनेक लोकांसह ताब्यात घेतले होते. न्यायालयाने आर्यनसह सर्व आरोपींना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तणावापासून दूर राहण्यासाठी प्रियांका पोहचली माशांच्या जगात, स्पेनमध्ये करतेय स्कूबा डायविंग

-निक जोनास पत्नी प्रियांका चोप्रावर किती प्रेम करतो? लाईव्ह कॉन्सर्टमध्ये व्यक्त केल्या आपल्या भावना

-‘द बिग पिक्चर’ शोदरम्यान रणवीर सिंग झाला भावूक, ‘या’मुळे अभिनेत्याला अनावर झाले अश्रू

Latest Post