Saturday, July 6, 2024

खरंच की काय! राजेश्वरी खरातला झालंय प्रेम? व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

नागराज मंजुळे यांच्या ‘फॅन्ड्री’ या चित्रपटातून नावारूपाला आलेली मराठी म्हणजे राजेश्वरी खरात. तिचे या चित्रपटातील शालू हे पात्र चांगलेच गाजले होते. आपल्या साध्या भोळ्या अंदाजाने सर्वांना तिच्या प्रेमात पाडणारी शालू तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आहे. सध्या ती तिच्या चित्रपटापेक्षा सोशल मीडियावरील पोस्टमुळे फार चर्चेत असते. तिची फॅन फॉलोविंग देखील खूप आहे. त्यामुळे तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. अशातच तिचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामुळे ती चर्चेत आहे.

राजेश्वरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राजेश्वरीने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट स्लिव्हलेस ड्रेस परिधान केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘चोरी चोरी सपनों मे आता है कोई’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “मुझे प्यार हो गया.” तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. तिचे चाहते नेहमीच तिच्या फोटो आणि व्हिडिओला प्रतिक्रिया देत असतात.

तिच्या सोशल मीडियावरील वावरामुळे ती खूप लोकप्रिय झाली आहे. राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फॅन्ड्री’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. या एकाच चित्रपटाने तिला भरभरून ओळख दिली. त्यानंतर तिने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी तिच्या ‘रेडलाईट’ या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट एका वैश्या जीवनावर आधारित आहे. त्यामुळे आता या चित्रपटातील तिची भूमिका बघण्यासाठी उत्सुक आहेत. (marathi actress rajeshwari kharat’s dance video viral on social media )

राजेश्वरीला तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. काहींना तिचा अंदाज आवडतो तर काहींना आवडत नाही. परंतु चुकीच्या कमेंटला राजेश्वरीने सडेतोड उत्तर देखील दिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी

-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…

-रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी बेडरेस्टवर आहे नुसरत भरुचा; ‘या’ कारणामुळे अचानक बिघडली होती तब्येत

हे देखील वाचा