Friday, May 22, 2026
Home बॉलीवूड ‘भूत बंगला’ रिलीजआधी सासू डिंपल कपाडियांसोबत अक्षय कुमारने घेतले महाकालेश्वरचे दर्शन

‘भूत बंगला’ रिलीजआधी सासू डिंपल कपाडियांसोबत अक्षय कुमारने घेतले महाकालेश्वरचे दर्शन

अक्षय कुमार हा एक लोकप्रिय बॉलीवूड स्टार आहे. जो सध्या त्याच्या आगामी चित्रपट भूत बंगला मुळे चर्चेत आला आहे. अक्षय कुमारने आतपर्यत उत्तम चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहे. प्रियदर्शन  आणि अक्षय कुमार यांची जोडी या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर येत आहे. त्यामुळेच प्रेक्षकांनाही या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. तर  भूत बंगला या चित्रपटाच्या रिलीज आधी अक्षय कुमार आणि त्याची सासूबाई आणि ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यासोबत उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराला भेट दिली होती.

अक्षय (akshay)कुमारने आगामी ‘भूत बंगला’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी, अक्षयने भगवान शिव आणि नंदी यांची विशेष पूजा केली. मंदिराच्या आवारातून बाहेर पडताना, अक्षय कुमारने या भेटीचा आपला अनुभव माध्यमांशी शेअर केला. तो म्हणाला, “मी संपूर्ण देशाच्या समृद्धीसाठी आणि माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. मी फक्त एवढीच प्रार्थना केली की आपला देश नेहमी प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहो आणि जगात आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करो.” त्याच्या या आध्यात्मिक यात्रेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या चित्रपटात अक्षय कुमारसोबत परेश रावल, असरानी आणि राजपाल यादव हे कलाकार सुध्दा असणार आहेत. वामिका गब्बी आणि तब्बू यांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाला आनोखा पैलु लाभला आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती बालाजी मोशन पिक्चर्स आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने झाली आहे. तसेच शोभा कपूर आणि एकता कपूर यांनी निर्मिती केली आहे. ‘भूत बंगला’ 10 एप्रिल 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

वेलकम मधील अक्षय कुमारची स्टायलिश मामी आठवतेय? आता इतका बदलला लूक की ओळखणंही आहे कठीण

हे देखील वाचा