Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड भन्साळी यांच्यासाठी खूपच खास आहे चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’; म्हणाले ‘मी यासाठी माझे…’

भन्साळी यांच्यासाठी खूपच खास आहे चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’; म्हणाले ‘मी यासाठी माझे…’

बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’ याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी टीझर समोर आला आहे. प्रेक्षकांनी या टीझरला भरभरून प्रतिसाद देखील दिला. या चित्रपटाची शूटिंग नुकतीच पूर्ण झाली आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण होण्यासाठी एक वर्षापेक्षाही जास्त काळ लागला आहे. संजय लीला भन्साळी यांच्या या चित्रपटात आलिया भट्ट ही मुख्य भूमिकेत आहे. कोरोना विषाणूमुळे या चित्रपटाला खूप वेळ लागला आहे.

या चित्रपटाबाबत संजय लीला भन्साळी यांनी इ-टाइम्ससोबत बोलताना सांगितले की, “हा माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे. हे आमच्यासाठी अजिबात सोप्पे नव्हते. कारण या चित्रपटाची शूटिंग आम्ही महामारी दरम्यान केली आहे. त्यामुळे मी सगळे प्रयत्न केले आहेत. आता मी हा चित्रपट तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करण्यासाठी जास्त वाट बघू शकत नाही.” तसेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अजूनही समोर आली नाही.(bollywood sanjay leela bhansali says gangubai kathiyawadi is a very special film to me i have given my all)

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट मुंबईमधील माफिया क्वीन ‘गंगुबाई काठियावाडी’ वर आधारित आहे. जी सुरुवातीला एक सेक्स वर्कर असते आणि नंतर ती एक अंडरवर्ल्ड डॉन बनते. हा चित्रपट लेखक हुसैन जैदी यांचे पुस्तक ‘माफिया क्वीन ऑफ मुंबई’ वर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट ही मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे अनेक पोस्टर प्रदर्शित झाले आहेत. ज्यात आलिया भट्टचा लूक जबरदस्त दिसत आहे.

गंगुबाई काठियावाडी ही एक मुंबईमधील एक चर्चित कोठेवाली होती. जिच्या पतीने तिला केवळ 500 रुपयांसाठी विकले होते. या चित्रपटात तिचा संघर्ष दाखवला आहे. अगदी लहान वयात तिचे लग्न होते. नंतर तिचा पती पैशासाठी तिला विकतो. तिचा जीवन प्रवास दाखवला आहे. संजय लीला भन्साळी या चित्रपटाबाबत खूप उत्साहित आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता ‘जेह’ सैफ करीनाच्या मुलाचे खरे नाव नाही? मग काय आहे त्याचे नाव? जाणून घ्या

-अभिनव शुक्ला ‘या’ आजाराने आहे ग्रस्त, तर आजार स्वीकारण्यास लागली तब्बल २० वर्षे

-बिग बॉसच्या घरात शमिता शेट्टीच्या पुनरागमनाने प्रेक्षकांमध्ये पसरली नाराजी; युजर्स म्हणतायेत, ‘टीआरपीसाठी…’

हे देखील वाचा