Friday, March 29, 2024

काय सांगता ‘जेह’ सैफ करीनाच्या मुलाचे खरे नाव नाही? मग काय आहे त्याचे नाव? जाणून घ्या

स्टार्स किड्सबद्दल प्रेक्षकांच्या मनात असलेली उत्सुकता तर सर्वश्रुत आहे. कलाकार आणि त्यांचे मुलं हा मीडियामध्ये, सोशल मीडियावर आणि इंटरनेटच्या जगात सर्वाधिक प्रकाशझोतात असलेला विषय आहे. कलाकरांना जेवढे महत्व मिळते तेवढेच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक महत्व त्यांच्या मुलांना मिळते. या लहान मोठ्या सर्व स्टार्सकिड्स मागे पापराजींचा कॅमेरा सतत फिरत असतो.

सर्व स्टार्स किड्समध्ये पातोडी खानदानातील मुलांची बातच निराळी आहे. तैमूर असला काय नाही तर आता करीना आणि सैफचा दुसरा मुलगा. या दोघांवर सतत मीडियाचा तिसरा डोळा असतो. फेब्रुवारी २०२१ मध्ये करिनाने तिच्या आणि सैफच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. मात्र आता सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला असला तरी करीना आणि सैफने अजूनही त्यांच्या मुलाचा चेहरा जगासमोर दाखवला नाहीये. मात्र असे असले तरी त्याची क्रेझ काही कमी नाही. लोकांना त्याच्याबद्दल जाणून घ्यायचेच असते.  (kareena kapoor and saif ali khan second son name)

मध्ये बातम्या आल्या की, सैफ आणि करिनाने त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव ‘जेह’ असे ठेवले आहे. मात्र आता असे सांगण्यात येत आहे की, त्याचे खरे नाव ‘जेह’ नसून दुसरे आहे. काही दिवसांपूर्वीच करिनाने तिचे ‘प्रेग्नेंसी बाइबल: द अल्मेटीमेट मैन्युअल फॉर मॉम टू बी’ हे पुस्तक प्रकशित केले. या पुस्तकात तिने तिचे सर्व आई होण्याचे अनुभव एकत्र केले आहेत. या संपूर्ण पुस्तकात तिने तिच्या दुसऱ्या मुलाला ‘जेह’ म्हटले आहे, मात्र पुस्तकाच्या शेवटच्या पानांमध्ये तिने त्याच्या नावाचा खुलासा करत सर्वांना सरप्राइज केले आहे.

प्राप्त माहितीनुसार करिनाने शेवटच्या पानावर तिच्या दुसऱ्या प्रेग्नन्सी दरम्यानचा आणि प्रेग्नन्सीनंतरचा मुलासोबतचा फोटो ठेवला आहे. यावर तिने कॅप्शनमध्ये दुसऱ्या मुलाचे नाव ‘जहांगीर’ असल्याचे लिहिले आहे.  यावरून असेच लक्षात येते की, त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर असे ठेवले आहे. ‘जेह’ हे त्याचे घरातील नाव असून तर ‘तैमूर’ला घरात ‘टीमटीम’ म्हटले जाते.

‘जहांगीर’ हे नाव मुगल बादशाह अकबरचा मुलगा मोहम्मद नूर-उद-दीन सलीम याचे दुसरे नाव होते. हा एक पारशी शब्द असून याचा अर्थ ‘संपूर्ण जगाचा राजा’ असा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

अरुणिता कांजिलालसोबतच्या आपल्या नात्यावर पवनदीप राजनचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘आम्ही एकमेकांच्या खूपच…’

सुपर्ब! मराठमोळ्या अनुजा साठेचा वर्कआऊट पाहून तुम्हीही व्हाल थक्क; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

‘आता तिला पाहून काळजाचा ठोका चुकणार नाही, तर कायमचा थांबणार’, ‘रात्रीस खेळ चाले ३’ चा प्रोमो प्रदर्शित

हे देखील वाचा