बिग बॉस मराठी फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे सई लोकूर होय. सई लोकूर ही चित्रपटासोबत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. ती तिच्या पतीसोबत देखील अनेकवेळा फोटो शेअर करत असते. अशातच सईने तिचे साडीवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहेत.
सईने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने निळ्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच कानात मोठे इअरिंग घातले आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने तिचे मंगळसूत्र हातात घातले आहे. ती एका झोपाळ्यावर बसलेली दिसत आहे. तसेच ती संपूर्ण केस मोकळे सोडून साडीवर पोझ देताना दिसत आहे.
हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “रंग जो तुम्हाला प्रेमात पाडतो.” तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. तिचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. तिचे चाहते या फोटोवर हार्ट ईमोजी तसेच ब्युटीफुल असे लिहून कमेंट करत आहेत. (sai lokur’s saree photos viral on social media )
सई ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये स्पर्धक होती. या शोमध्ये ती फिनालेपर्यँत गेली होती. पण ती हा शो जिंकू शकली नव्हती. पण त्यांनतर ती खूप चर्चेत आली होती. या शोने तिला खरी ओळख मिळाली.
सई लोकुरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘किस किस को प्यार करू’, ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘जरब’, ‘कुछ तुम कहो कुछ हम कहे’, ‘मी आणि तू’, ‘स्माईल प्लिज’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काय सांगता ‘जेह’ सैफ करीनाच्या मुलाचे खरे नाव नाही? मग काय आहे त्याचे नाव? जाणून घ्या
-अभिनव शुक्ला ‘या’ आजाराने आहे ग्रस्त, तर आजार स्वीकारण्यास लागली तब्बल २० वर्षे










