मराठी टेलिव्हिजनवर सध्या अनेक मालिका चालू आहे. त्यात स्टार प्रवाह या वाहिनीवरील मालिकांचा टीआरपी सर्वात जास्त आहे. या वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘फुलाला सुगंध मातीचा’. उत्तम शीर्षक गीत, उत्तम कहाणी आणि पात्र यामुळे प्रेक्षकांना ही मालिका प्रामुख्याने आवडते. या मालिकेत प्रमुख भूमिकेत असणारे शुभम आणि कीर्तीचे पात्र देखील प्रेक्षकांना आवडत आहे. नुकतेच या मालिकेचे ३०० भाग पूर्ण झाले आहेत. या निमित्त या मालिकेचा नायक हर्षद अटकरी याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
सर्वांचा लाडका शुभम म्हणजेच हर्षदाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या मालिकेचे शीर्षक गीत असलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्याने लिहिले आहे की, “हे फक्त आणि फक्त रसिक प्रेक्षकांमुळे शक्य होतंय. माझी चौथी मालिका, जिचे आज ३०० भाग पूर्ण होत आहेत. असंच प्रेम करत राहा, मी तुमचं मनोरंजन करण्याचा असाच प्रयत्न करत राहीन. आज सादर होतं आहे ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचा ३०० भाग. आपण या ३०० भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत. त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार! त्याच बरोबर या मालिकेचे लेखक, निर्माते ,दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार! आतापर्यँत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना.” (phulala sugandh maticha serial complete 300 episodes, harshad atakri share a post )
ही मालिका सध्या जोरदार चर्चेत आहे. शिकलेली पत्नी आणि अशिक्षित नवरा या दोघांचे प्रेम, त्यांचे विचार आणि स्वप्न या सगळ्या गोष्टी दिग्दर्शकांनी खूप चांगल्या प्रकारे मांडले आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता हर्षद अटकरी हे आहेत.
हर्षदने या आधी ‘दुर्वा’, ‘अंजली’, ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेत काम केले आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही त्याची चौथी मालिका आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काय सांगता ‘जेह’ सैफ करीनाच्या मुलाचे खरे नाव नाही? मग काय आहे त्याचे नाव? जाणून घ्या
-अभिनव शुक्ला ‘या’ आजाराने आहे ग्रस्त, तर आजार स्वीकारण्यास लागली तब्बल २० वर्षे










