Thursday, September 19, 2024
Home मराठी ‘पाहिले न मी तुला’ मालिकेचा शेवटचा भाग झाला शूट; फोटो शेअर करत अभिनेता आशय कुलकर्णी झाला भावुक

‘पाहिले न मी तुला’ मालिकेचा शेवटचा भाग झाला शूट; फोटो शेअर करत अभिनेता आशय कुलकर्णी झाला भावुक

सध्या झी मराठी या वाहिनीवरील अनेक मालिका शेवटच्या वळणावर आल्या आहेत. मालिकांची टीआरपी कमी झाल्याने अनेक मालिका संपून अनेक नवीन मालिका झी मराठीवर येत आहे. अशातच महेश कोठारे निर्मित ‘पाहिले न मी तुला’ ही मालिका देखील प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. विशेष म्हणजे ही मालिका सुरु होऊन अगदी काही महिन्यांचा कालावधी लोटला आहे, पण टीआरपीच्या स्पर्धेत ही मालिका मागे पडली. त्यामुळे लवकरच मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित केला जाणार आहे. जवळपास आता सगळ्या मालिकांच्या शूटिंग संपल्या आहेत. या मालिकेची शूटिंग देखील संपली आहे. या निमित्त मालिकेच्या मुख्य भूमिकेत असणारा अनिकेत म्हणजेच आशय कुलकर्णी याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून रसिकांचे आभार मानले आहे. (pahile na mi tula serial’s shooting end, aashay kulkarni share a post, give thanks to audience)

आशयने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मालिकेच्या शेवटच्या भागाच्या सीनचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “शेवटचा क्षण, शेवटची फ्रेम, मानसी आणि अनिकेतचा शेवटचा शॉट, तुमच्या प्रेमासाठी आभार.” यासोबत त्याने त्याच्या चाहत्यांचे देखील आभार मानले आहेत. ही मालिका सुरुवातीला प्रेक्षकांना खास पसंत पडली होती. पण नंतर मालिकेचा टीआरपी ढासळला.

या मालिकेत प्रमुख भूमिकेत अभिनेत्री तन्वी मुंडले, तसेच आशय कुलकर्णी आणि खलनायकाच्या भूमिकेत शशांक केतकर आहे. आशयची ही दुसरी मालिका आहे. या आधी त्याने ‘माझा होशील ना’ या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारली होती. पण शशांकच्या बाबतीत अगदी विरुद्ध झाले. शशांक हा टेलिव्हिजन वरील अत्यंत क्यूट अभिनेता आहे. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेने त्याला चांगलीच ओळख दिली होती. पण त्याला अचानक असे खलनायकाच्या भूमिकेत बघणे प्रेक्षकांना जड गेले आहे. यासोबतच तन्वीची ही पहिलीची मालिका आहे. पण तिला मात्र या मालिकेने चांगलीच ओळख मिळाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता ‘जेह’ सैफ करीनाच्या मुलाचे खरे नाव नाही? मग काय आहे त्याचे नाव? जाणून घ्या

-अभिनव शुक्ला ‘या’ आजाराने आहे ग्रस्त, तर आजार स्वीकारण्यास लागली तब्बल २० वर्षे

-बिग बॉसच्या घरात शमिता शेट्टीच्या पुनरागमनाने प्रेक्षकांमध्ये पसरली नाराजी; युजर्स म्हणतायेत, ‘टीआरपीसाठी…’

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा