मराठी संगीत क्षेत्रातील अत्यंत आघाडीचा आणि नावाजलेला गायक म्हणजे अवधूत गुप्ते होय. त्याच्या गाण्यांनी आणि आवाजाने त्याने संगीत प्रेमींच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे. अवधूत एका गायकसोबत एक उत्कृष्ट परफॉर्मर देखील आहे. या गोष्टीचा प्रत्येय आपल्याला त्याची गाणी बघताना आलाच आहे. त्याने मराठी संगीत सृष्टीला आणि महाराष्ट्राला एक पेक्षा एक सुरेल आणि सुपरहिट गाणी दिली आहे. त्याचे कोणतेही गाणे प्रदर्शित होण्याची प्रेक्षक केवळ वाट बघत असतात. अशातच अवधूत त्याच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी घेऊन आला आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली आहे.
अवधूत गुप्तेने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोमध्ये त्याच्यासोबत गायिका आर्या आंबेकर आणि गायक सलील कुलकर्णी दिसत आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक या एकाच फोटोमध्ये पाहून सर्वांनाच आनंद झाला आहे. (singer avdhoot gupte share a post and says something new is coming)
हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “तिघे एकत्र आहोत नक्कीच काहीतरी नवीन येत असणार हे नक्की. पण, ते काय असू शकतं? ओळखा बरं!” त्याची ही पोस्ट पहिल्यानंतर आता चाहते अनेक तर्क-वितर्क लावायला लागले आहेत. अनेकजण म्हणत आहेत की, गणपती विशेष गाणे येणार आहे. तर काहीजण म्हणत आहेत झी मराठीच्या नवीन मालिकांचे शीर्षक गीत येत असेल. काहीजण असा अंदाज लावत आहेत की, प्लॅनेट मराठी ओटीटीसाठी काहीतरी खास असेल. अशा प्रकारे चाहते वेगवेगळे अंदाज लावत आहेत. तसेच त्यांचा हा नवीन प्रोजेक्ट नक्की काय असणार आहे. हे जाणून घेण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत.
अवधूत गुप्ते, सलील कुलकर्णी आणि आर्या आंबेकर हे तिघेही खूप प्रसिद्ध गायक आहेत. आर्या आंबेकर ही ‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’ या शोमधून पुढे आली आहे. तिने अनेक चित्रपटांची तसेच मालिकांची शीर्षक गीत गायली आहेत. ती सध्या ‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’ या शोचे परीक्षण करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काय सांगता ‘जेह’ सैफ करीनाच्या मुलाचे खरे नाव नाही? मग काय आहे त्याचे नाव? जाणून घ्या
-अभिनव शुक्ला ‘या’ आजाराने आहे ग्रस्त, तर आजार स्वीकारण्यास लागली तब्बल २० वर्षे