Saturday, June 29, 2024

‘सिटी ऑफ ड्रीम्स’ला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद, आदिनाथ कोठारेने पोस्ट करून मानले आभार

आजकाल प्रेक्षकांमध्ये चित्रपटांप्रमाणेच वेबसिरीजची क्रेझ निर्माण झाली आहे. कोरोना काळात चित्रपटगृह बंद असल्याने प्रेक्षकांचा कल वेबसिरीजकडे जास्त होता. अजूनही ती आवड त्यांच्यामध्ये दिसून येत आहे. अशातच लोकप्रिय वेबसिरीज ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. प्रेक्षक या सीरिजच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघत होते. अशातच काही दिवसांपूर्वी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सिरीजचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. या भागाला देखील चांगलाच सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. अशातच या सिरीजमध्ये प्रेक्षकांसाठी सरप्राईज पॅकेज असलेल्या आदित्य कोठारेने एक खास पोस्ट केली आहे. (adinath kothare share a post and give thanks to audience for great responce for city of dreams season 2 )

आदित्यने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने हा फोटो शेअर करू लिहिले आहे की, “सिटी ऑफ ड्रीम्सला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १० दिवसात ही सिरीज ७६ लाख लोकांनी पाहिली आहे. या सीरिजला या वीकेंडला सर्वात जास्त पाहिली गेलेली सिरीज बनवल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार.” त्याची पोस्ट चांगलीच व्हायरल होतं आहे.. या सिरीजमध्ये आदिनाथ हा महेश आरवाले ही भूमिका साकारताना दिसत आहे.

‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या दुसऱ्या सीझनमध्ये मराठामोळ्या पात्रांनी प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतलेले दिसत आहे. सिरीजमध्ये येत असलेल्या ट्वीस्टनी ती अधिकच रंजक बनली आहे. आताही या सीझनमध्ये राजकारण, सत्ता, नाती, यातील गुंतागुंत आणि रहस्य यावर आधारित दुसऱ्या सीझनने प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळवली आहे. यामध्ये प्रिया बापट तसेच सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार देखील आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता ‘जेह’ सैफ करीनाच्या मुलाचे खरे नाव नाही? मग काय आहे त्याचे नाव? जाणून घ्या

-अभिनव शुक्ला ‘या’ आजाराने आहे ग्रस्त, तर आजार स्वीकारण्यास लागली तब्बल २० वर्षे

-बिग बॉसच्या घरात शमिता शेट्टीच्या पुनरागमनाने प्रेक्षकांमध्ये पसरली नाराजी; युजर्स म्हणतायेत, ‘टीआरपीसाठी…’

हे देखील वाचा