Tuesday, July 9, 2024

धक्कादायक! 31वर्षीय गरोदर मॉडेलचा मृतदेह फ्रिजमध्ये; बांधून ठेवले होते हातपाय

मनोरंजन विश्वाातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेत्रीची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मलीसा मूनीचा मृतदेह फ्रिजमध्ये भयानक अवस्थेत आढळला आहे. मलीसा मूनी गरोदर असल्याची माहितीही समोर आली आहे. लॉस एंजेलिस येथील 31 वर्षीय मॉडेलची तिच्या राहत्या घरात 12 सप्टेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. मृतावस्थेत आढळलेली 31 वर्षीय मॉडेल दोन महिन्यांची गर्भवती होती.

मलीसा मूनी (Malissa Mooney)लॉस एंडेलिसमध्ये राहत होती. तिचा मृतदेह एका फ्लॅटमध्ये आढळला. मलीसा मूनीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात मलीसा मूनीचा मृत्यू हिंसक हल्ल्यात झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मलीसा मूनीच्या हात-पाय घट्ट बांधून ठेवलेले होते. तसेच तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर मारहाणीचे निशाण होते.

मलीसा मूनीच्या मृत्यूने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मलीसा मूनी एक लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेत्री होती. तिने अनेक मॉडेलिंग आणि चित्रपटांमध्ये काम केले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीला अटक करण्यासाठी तपास करत आहेत. मलीसा मूनीच्या मृत्यूवर सोशल मीडियावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या आठवणींना उजाळा दिला आहे.मलीसा मूनीच्या मृत्यूमुळे मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुनीची बहीण म्हणाली, “माझ्या बहिणीला काय झाले असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही, याचा विचार करूनच मला थरकाप होतो.” त्याचवेळी, पोलिसांनी सांगितले की, मुनीच्या मोबाईल फोन आणि मॅकबुकशी लिंक असलेल्या आयक्लॉडमध्ये एक अलर्ट होता. ज्याचा अर्थ असा होता की दुसरा कोणीतरी तिचा फोन वापरत होते. (31 year old pregnant model found bloodied in fridge Model and actress Malissa Mooney dies)

आधिक वाचा-
काजल अग्रवालने घेतले नवीन घर, पूजा करताना अभिनेत्रीने शेअर केले फोटो
‘ब्रह्मास्त्र’नंतर बदलले मौनी रॉयचे आयुष्य; म्हणाली, ‘माझ्या करिअरमधील टर्निंग पॉईंट होता’

हे देखील वाचा