मनोरंजन विश्वातून एक काळीज तोडणारी बातमी समोर आली आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेते कुंद्रा जॉनी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे. कुंद्रा जॉनी यांचे निधन मल्याळम चित्रपटसृष्टीसाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या निधनाने मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक मोठा कलाकार हरवला आहे.
बुधवारी (18ऑक्टोबर) सकाळी 10 वाजल्यापासून कोल्लम कडापक्कडा स्पोर्ट्स क्लबमध्ये अंत्यदर्शनासाठी कुंद्रा जॉनी (Kundra Johnny) यांचं पार्थिव ठेवण्यात आलं आहे. दुपारी 3.30 वाजता त्यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार असून गुरूवारी (19 ऑक्टोबर) सकाळी 10वाजता कांजीराकोड येथील सेंट एंथोनी चर्च परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
कुंद्रा जॉनी यांचा जन्म कांजीराकोड जिल्ह्यातील कन्नूर येथे झाला होता. त्यांनी 1970च्या दशकात अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी विविध भूमिका साकारल्या आणि त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कुंद्रा जॉनी यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा केरळ राज्य पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
अभिनेते कुंद्रा जॉनी यांनी आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत जवळपास 500 चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी विविध भूमिका साकारल्या आणि त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कुंद्रा जॉनी यांनी वयाच्या २३ व्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी १९७९ च्या मल्याळम चित्रपट ‘नित्या वसंतम’मध्ये 55 वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले, ज्यात ‘गॉडफादर’, ‘इन्स्पेक्टर बलराम’, ‘अवनाझी’, ‘राजविंते माकन’, ‘ओरू सीबीआय डायरी कुरिप्पू’, ‘किरीडोम’, ‘ओरू वदक्कन वीरगाथा’ आणि ‘समोहम’ यांचा समावेश आहे. त्यांनी मल्याळमसोबत तमिळ चित्रपटांमध्येही काम केले. (Famous actor of south film industry Kundra Johnny has passed away)
आधिक वाचा-
–स्वतःचं घर विकून डॉ. अमोल कोल्हेंनी केली होती ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेची निर्मिती, वाचा त्यांचा जीवनप्रवास
–झीनत अमानने कर्जावर घेतले कपडे आणि दागिने, खुद्द अभिनेत्रीने केला खुलासा; म्हणाली, ‘बँक बॅलन्स खर्च…’