Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड प्रसिद्ध गायिकेचं कॉन्सर्ट सुरु होण्याआधी 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि 60हून अधिक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रसिद्ध गायिकेचं कॉन्सर्ट सुरु होण्याआधी 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि 60हून अधिक जखमी, नेमकं काय घडलं?

कोची विद्यापीठातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध गायिका निखिता गांधीच्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अचानक पाऊस आल्याने विद्यार्थींची मोठी खळबळ उडाली आणि चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाल्याने चार विद्यार्थी ठार आणि अनेक जखमी झाले.

झालं असं की, जोराचा पाऊस अचनाक सुरू झाला. त्यामुळे लोकांची धावपळ सुरू झाली आणि हा घटना घडली. कोची विद्यापीठातील तंत्रज्ञान विद्यापीठात झालेल्या चेंगराचेंगरीत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 60 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. रविवारी संध्याकाळी गायिका निखिता गांधीचा (Nikhita Gandhi) कॉन्सर्ट सुरू होण्याआधी ही घटना घडली. मोठ्या संख्येने विद्यार्थी कॉन्सर्ट पाहण्यासाठी उपस्थित होते.

जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या सरकारी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आपत्कालीन सेवांनी त्वरित प्रतिसाद दिला आणि जखमींना उपचारासाठी कलामसेरी वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी पीडितांसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे.

चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली आहे. मृतांपैकी तिघांची ओळख पटली आहे. तिघेही केरळमधील रहिवासी आहेत. तर चौथ्या मृताची अद्याप ओळख पटलेली नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

या घटनेवर गायिकेने एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. ही पोस्ट लिहिताना तिने लिहिले की, “आज संध्याकाळी कोचीमध्ये घडलेल्या घटनेमुळे मी खूप दु:खी झाले. मी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली. हे दु:ख व्यक्त करण्यासाठी शब्दच पुरेसे नाहीत.” तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

निकिता गांधीच्या कामाविषया बोलायच झांल तर, तिने नुकताच रिलीज झालेला सलमान खानचा ‘टायगर 3′ या चित्रपटातील लेके प्रभू का नाम हे गाणं देखील निकितानं गायलं आहे. यापूर्वी तिने .’आओ कभी हवेली पे’, उल्लू का पट्ठा आणि ‘पोस्टर लगवा दो’ ही गाणी देखील गायली आहेत. (4 students killed and over 60 injured before famous singer Nikhita Gandhi concert started)

आधिक वाचा-
माकडाने चोरली श्रद्धा कपूरची ‘ही’ खास गोष्ट, अभिनेत्रीची प्रतिक्रिया पाहून तुम्हाला बसेल धक्का
परिणीती चोप्रा फॅन क्लबवर नाराज, सोशल मीडियावर कारवाईची धमकी

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा