Monday, February 26, 2024

बाॅलिवुडमध्ये पदार्पण करण्याआधी बाॅर्डरवर देशसेवा करत होते ‘हे’ 5 ऍक्टर, जाणून घ्या कोण आहेत ते

बॉलिवूडमध्ये देशभक्तीवर आधारित अनेक सिनेमे बनले आहेत. ज्यात कधी देशाची आर्मी, कधी नेवी तर कधी एअरफोर्स हिरोप्रमाणे दाखवले जाते. जे देशाच्या रक्षणासाठी आपला जीव देखील पणाला लावतात. या ग्लॅमरच्या दुनियेत लष्कराच्या जवानांचे शौर्य अनेकवेळा दिसून आले आहे. पण, तुम्हाला माहित आहे का? की मनोरंजन व्यावसायातील असे अनेक कलाकार आहेत जे एकेकाळी खरोखरंच सैन्यात होते, आणि देशसेवा करत होते. कधी आर्मीचे शिपाई तर कधी नौदलाचे कॅडेट म्हणून ते शत्रूंना सळो की पळो करत होते. देशभक्तीच्या आवडीमुळे देशाची सेवा केल्यावर त्यांनी या ग्लॅमरच्या जगात पाऊल टाकले आहे. चला अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेवुया जे इडस्ट्रीत येण्याआधी शूर सैनिक होते.

गुफी पेंटल(Gufi Paintal)
अभिनेता गुफी पेंटल याने महाभारतात शकुनीची भूमिका साकारली होती. हे फारच कमी लोकांना माहिती आहे की, गुफी पेंटलने इंजिनियरिंगची डिग्री घेतली होती. पण तो इंजिनीअरिंग शिकत होता तेव्हा भारत-चीन युद्ध सुरू होते. 1962 च्या त्या युद्धात त्याची सैन्यात थेट भरती झाली आणि गुफी पेंटल सैन्यात दाखल झाले.त्यापुढे बाॅर्डरवर ‘रामलीला’ नावाच्या एका नाटकात त्याने ‘सीतेची ‘ भुमिका साकारली होती. तिथुन त्याला ऍक्टिंगमध्ये आवड निर्माण झाली आणि पुढे मुंबईला येऊन त्याने असिस्टंट डिरेक्टरच्या कामापासून सुरुवात करत अनेक कार्यक्रमांमध्ये महत्तवाच्या भुमिका बजावल्या.

अच्युत पोतदार(Achyut Potdar)
तुम्हाला 3 इडियट्समधला तो प्रोफेसर आठवत असेल, ज्याचा डायलॉग होता ‘अरे कहना क्या चाहते हो’. तेच अच्युत पोतदार या सिनेसृष्टीत पदार्पण करण्याआधी लष्कराचा भाग होते. सिनेसृष्टीच्या प्रवासाला सुरूवात करण्यापूर्वी अच्युत पोतदार मध्य प्रदेशातील रीवा शहरात प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्यालंतर त्यांनी भारतीय सैन्य दलात कॅप्टन म्हणूनही काम केलं. आणि तिथुन ते 1967 मध्ये निवृत्त झाले. त्यानंतरही त्यांनी इंडीयन ऑईल कंपनीत काम केले आणि ते काम करतानाच त्यांनी या कंपनीतील नाटक आणि कल्चरल ऍक्टीव्हीटीजमध्ये सहभागी होत आणि अनेक कल्चरल इव्हेंट होस्ट केले. त्यांनी कधीही स्वतःहुन रोल न मागता ज्या मिळाल्या त्याच भुमिका मनापासुन साकारल्या आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

बिक्रमजीत कंवरपाल(Bikramjeet Kanwarpal)
बिक्रमजीत कंवरपाल यांनी जरी या जगाचा निरोप घेतला असेल तरीही ते त्यांच्या उत्कृष्ट भूमिका आणि अभिनयामुळे कायम लक्षात राहतील. हा अभिनेता आर्मी ऑफिसरचा मुलगा असल्यामुळे शिक्षण पुर्ण केल्यावर ते भारतीय सैन्य दलात भरती झाले. पुढे 2002 मध्ये भारतीय दलात मेजर म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांचं बालपणीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते मायानगरीत म्हणजेच मुंबईत आले. तुम्ही त्यांना ‘अतिथी तुम कब जाओगे’, ‘मर्डर’ आणि ‘आरक्षण’ यांसारख्या चित्रपटांमध्ये पाहू शकता.

आनंद बक्षी(Anand bakshi )
आनंद बक्षी यांची गाणी तुम्ही वर्षानुवर्षे ऐकली आहेत. त्यांच्यासारख्या गीतकारांना विसरता येणं अशक्यच. पण तुम्हाला माहिती आहे का? सुमारे तीन हजार गाणी लिहिणारे आनंद बक्षी हे रॉयल इंडियन नेव्हीचे कॅडेट होते.1947 ते 1956 या काळात त्यांनी लष्करात काम केले. त्यांनी तरुण वयातंच कविता लिहायला सुरुवात केली. त्यांनी तरुण वयातंच कविता लिहायला सुरुवात केली होती.परंतु त्यांनी जास्त लिखाण हे त्यांची आवड म्हणुनच केलं. 1998 मध्ये भला आदमी या चित्रपटातुन त्यांना प्रसिद्धी मिळाली.त्यांंनी या चित्रपटात 4 गाणी लिहिली होती.

रुद्राशीष मुजमदार(rudrashish majumder)
छिछोरे, हवा सिंग, जर्सी आणि मिसेस अंडरकव्हर यांसारख्या चित्रपटांमध्ये सहकलाकाराच्या भुमिकेत काम केलेला रुद्राशीष मजुमदार सात वर्षांपासून भारतीय लष्करात आहेत. ते सैन्यातून मेजर पदावर निवृत्त झाले आणि नंतर त्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या प्रवासाला सुरुवात केली.

हे देखील वाचा