दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अनेक उत्तमोत्तम शो आणि चित्रपट प्रदर्शित झाले. ज्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. मोठ-मोठ्या कलाकारांना टक्कर देत बालकलाकारांनीही २०२१ हे वर्ष गाजवले. चला तर मग २०२१ सालातील त्या बालकलाकारांची नावे जाणून घेऊया ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.
‘अजीब दास्तान’ – इनायत वर्मा
गेल्या वर्षी २०२० मध्ये ९ वर्षीय इनायत वर्माला (Inayat Verma) ‘मिनी’ म्हणून ‘लुडो’मध्ये चाहत्यांची मने जिंकताना पाहिले गेले. या वर्षीही तिने अँथॉलॉजी चित्रपट ‘अजीब दास्तान’च्या टॉय सेगमेंटमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर मोठा प्रभाव पाडला. तिने नुसरतच्या धाकट्या बहिणीची भूमिका केली होती.
‘पग्लैट’- सचिन चौधरी
‘पग्लैट’ चित्रपटातील सचिन चौधरीने (Sachin Chaudhary) कमी स्क्रीन वेळेतही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संपूर्ण चित्रपट गंभीर विषयावर आधारित असूनही, त्याचे डायलॉग प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणतात. ‘पग्लैट’ व्यतिरिक्त तो ‘बॉम्बे बेगम’मध्ये अमृता सुभाषच्या मुलाच्या भूमिकेतही दिसला आहे.
‘आर्या’- प्रत्यक्ष पनवार
प्रत्यक्ष पनवार (Pratyaksh Panwar) शोमध्ये ‘आर्या’ आणि ‘तेज’ यांचा धाकटा मुलगा आदित्य उर्फ आदिच्या भूमिकेत दिसला. त्याला पाहून खूप आनंद झाला, कारण त्याच्या व्यक्तिरेखेने सर्वांच्या लक्षात आणून दिले की, जेव्हा कुटुंबात काही मोठे घडते तेव्हा त्याचा परिणाम मुलांवरही होतो.
‘द फॅमिली मॅन सीझन २’, पग्लैट- अश्लेषा ठाकूर
अश्लेषा ठाकूरने (Ashlesha Thakur) ‘फॅमिली मॅन’मध्ये धृती (मनोज बाजपेयीची मुलगी) ची भूमिका केली होती आणि ‘पग्लैट’ चित्रपटात अदितीची (तरुणची मुलगी) भूमिका साकारली होती.
‘द फॅमिली मॅन सीझन २’- वेदांत सिन्हा
मनोज बाजपेयी यांचा मुलगा अथर्वची भूमिका साकारणारा वेदांत सिन्हा (Vedant Sinha) या शोचा स्टार होता. काही गंभीर क्षणांतही त्याने सिरीजमधील मजा कायम ठेवली.
हेही वाचा :










