Thursday, November 21, 2024
Home बॉलीवूड अवघ्या पाच महिन्यात ‘या’ ५ दिग्गज गायकांनी गमावला जीव, एकाची तर गोळ्या झाडून हत्या

अवघ्या पाच महिन्यात ‘या’ ५ दिग्गज गायकांनी गमावला जीव, एकाची तर गोळ्या झाडून हत्या

जाणारा जातो, पण मागे राहणाऱ्यांना चटका लावून जातो. हे २०२२ वर्ष भारतीय संगीत क्षेत्रासाठी असेच राहिल्याचे दिसते. एक दोन नव्हे तर संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज गेल्या ५ महिन्यात आपल्याला कायमचे अलविदा करून गेले. असे असले तरी त्यांच्या संगीतातील योगदानाने ते कायमच आपल्यात राहतील हे मात्र नक्की, पण कोण होते हे दिग्गज हे या लेखातून जाणून घेऊ.

काही दिवसांपूर्वी म्हणजेच ३१ मे रोजी कृष्णकुमार कुन्नथ उर्फ केके याचे निधन झाले. ५३ वर्षांचा असलेल्या केकेला कोलकातातील लाईव्ह कॉन्सर्टनंतर हार्ट ऍटॅक आल्याचे समोर आले होते. त्याने त्याच्या करियरमध्ये अनेक हिट गाणी दिली. यातील त्याची प्यार के पल, यारों, बिते लम्हे यांसारखी अनेक गाणी गाजली. हम रहे ना रहे कल हे त्याने स्टेजवर गायलेलेलं अखेरचं गाणं ठरलं…. केकेने त्याच्या करियरमध्ये हिंदीव्यतिरिक्त मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नडा, मल्याळम, बेंगाली अशा विविध भाषांमध्ये गाणी गायली. केके जाण्यापूर्वी दोन दिवस आधीच पंजाबमधील गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या झाली. राजकारणातही सक्रिय असलेला मुसेवाला याला गोळ्या घालण्यात आल्या होत्या, त्यानंतर उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. २८व्या वर्षीच त्याचे भारतातच नाही, तर भारताबाहेरही अनेक चाहते होते.

हेही पाहा- कुणाला अटॅक तर कुणाचं जुणं दुखणं वर आलं, स्टेजवरच प्राण सोडलेले कलाकार

याआधीही भारतीय संगीत क्षेत्राला मोठे धक्के बसले होते ते, संतूर संगीतकार पंडीत शिवकुमार शर्मा, गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाने. ही दोन्ही नावं भारताच्या संगीत क्षेत्रातील महान नावं आहेत. ८४ वर्षीय पंडीत शिवकुमार शर्मा यांना १० मे रोजी हार्ट ऍटॅक आला, ज्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी अनेक दिग्गज गायकांबरोबर काम केले होते. त्यांच्या अंतिम प्रवासात तबला वादक झाकीर हुसैन देखील सहभागी झाले होते. हुसैन आणि पंडीत शिवकुमार शर्मा चांगले मित्र होते. शास्त्रीय संगीत घराघराक पोहचवण्यात या दोघांनीही मोठा हातभार लावलाय, तर गानकोकीळा, स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे नाव तर भारतातच नाही, तर जगभरात गाजले. लता मंगेशकर म्हणजे भारतीय संगीतसृष्टीतील एक सुवर्णपानच असं आपण नक्कीच म्हणू शकतो, पण दीर्घ आजारानंतर त्यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारताचा एक तारा निखळल्याच्या भावना सर्वच स्तरातून व्यक्त झाल्या होत्या. जवळपास ७ दशके त्यांच्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. अजीब दास्तां है ये, ये रातें ये मौसम, अशी अनेक त्यांच्या आवाजातील गाणी आजरामर झाली आहेत.

इतकंच नाही, तर या वर्षात बप्पी लहरी, संध्या मुखर्जी यांसारखे सितारेही निखळले. लता मंगेशकरांच्या शोकातून चाहते बाहेर येतच असताना १५ फेब्रुवारी रोजी मोठा धक्का बसला तो बप्पी लहरी यांच्या जाण्याने. ६९ व्या वर्षी बप्पीदांनी दीर्घ आजारानंतर अखेरचा श्वास घेतला. त्यांनी हिंदीतच नाही, तर भारतातील विविध भाषांमध्येही अनेक गाणी गायली. त्यांना डिस्को किंग म्हणूनही ओळखले जायचे. बप्पी लहरी गेले, त्याचदिवशीचा संध्या मुखर्जी यांचेही निधन झाले. पार्श्वगायिका आणि गिटारवादक म्हणून नाव कमावलेल्या संध्या मुखर्जी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा