बॉलिवूड म्हणलं की, रोजच काहीतरी मसाला पाहायला मिळतोच मिळतो, त्यातच अभिनेत्री राखी सावंत तर वेगवेगळ्या कारणांनी सातत्यानं बातम्यांचा विषय ठरलेली असते. कधी तिची विधानं, तर व्हिडिओ व्हायरल होत असतात आणि आता गायक मिका सिंगही त्याच्या स्वंयवरामुळे ट्रेंडिगमध्ये आहे. त्याच्या स्वयंवराबद्दल वेगवेगळ्या चर्चा रोज ऐकायला आणि पाहायलाही मिळातायेत. तसं मिकाचं करियर पाहिलं तर बरंच वादग्रस्त राहिलं, पण तुम्हाला माहितीये का, की कधीकाळी चांगले मित्र असलेल्या याच राखी सावंत आणि मिका सिंग यांच्यातही एक मोठा वादही झालेला. प्रकरण अगदी पोलिस कंप्लेंटपर्यंत गेलेलं. आता नक्की झालं काय होतं हेच जरा खोलात जाऊन जाणून घेऊ, पण आता त्याला १६ वर्षे मागे जावं लागेल.
तर बऱ्याच रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे झालं असं की, २००६मध्ये मिका सिंगने त्याच्या वाढदिवसाची पार्टी ठेवलेली. त्यावेळी त्या पार्टीत राखी देखील पोहचलेली. सर्वकाही ठीक सुरू होतं, पण अचानक मिका सिंगने राखी सावंतला जबरदस्ती किस केलं आणि राडा झाला. या घटनेची मीडियात बरेच दिवस चर्चा झाली. अनेक बातम्या आल्या. राखी सावंत आणि मिका सिंग बराच दिवस हॉट टॉपिक बनून राहिले. इतकंच नाही, तर राखीने मिका सिंगविरुद्ध
विनयभंगाची तक्रारही दाखल केली. या घटनेचे फोटोही व्हायरल झालेले. मिकाने तर त्यानंतर चक्क ‘ए भाई तुने पप्पी क्यू ली’ हे गाणंही रिलीज केलं होतं. त्यामुळेही हा वाद बराच गाजलेला.
हेही पाहा- धडा शिकवण्यासाठी जेव्हा मिकाने जबरदस्तीने राखीला किस केला
यानंतर काही रिपोर्ट्सनुसार बऱ्याच वर्षांनी मिकाने या घटनेबद्दल एका मुलाखतीत खुलासा केलेला. त्याने सांगितलेलं की सर्वकाही चांगलं सुरू होतं, पण पार्टीत राखी त्याच्याबरोबर ओव्हर फ्रेंडली होत होती. तसेच त्याने केक कापण्यापूर्वी सर्वांना सांगितलेलं की कोणीही त्याच्या तोंडाला केक लावणार नाही, त्याला ऍलर्जी आहे, पण राखी सावंतने ऐकले नाही आणि तिने त्याच्या तोंडाला केक लावला. मग त्याला राग आला अन् त्याने रागात तिला धडा शिकवण्यासाठी सर्वांसमोर किस केलं. यानंतर काही वेळातच फोटो व्हायरल झाले. तसेच असंही म्हटलं जातं की राखीच्या बॉयफ्रेंडनेही त्या घटनेनंतर तिथे राडा घातलेला. आजही त्यांच्या या घटनेबद्दल चर्चा होतंच असते.
तरी, नंतर फार काही झालं नाही, पण या घटनेनंतरही राखी आणि मिका या दोघांनीही इंडस्ट्रीत टिकून राहात आपली ओळख बनवली. तसेच अनेकदा ते दोघे एकत्र आलेलेही दिसले. राखी बिग बॉस मध्ये सहभागी झालेली असतानाही मिका पाहूणा म्हणून शोमध्ये आलेला तेव्हाही हे दोघे समोर आलेले. त्यावेळी सलमाननेही किसच्या घटनेवरून दोघांची पायखेची करण्याचा प्रयत्न केलेला. असे असले तरी कधी हे दोघे एकमेकांचे कौतुक, तर कधी एकमेकांवर आरोप करताना दिसतात, पण एवढं नक्की की आशा गोष्टींमुळे दोघं चर्चेचा केंद्रबिंदू मात्र नक्कीच ठरतात. त्यातच आता मिका स्वंयवर करतोय म्हणल्यावर राखीचाही विषय समोर येतोच. कारण तिनेही असंच स्वयंवर केलेलं आहे, पण ते फार काळ टिकलं नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-