विकी अन् कॅटरिनाचा शाही लग्नसोहळा! लग्नात कापणार थेट ‘इतक्या’ थरांचा केक, इटलीवरून मागवलाय शेफ


बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif)आणि विकी कौशलच्या (Vicky Kaushal) लग्नाचे विधी मंगळवारपासून (०७ डिसेंबर) सुरू झाले आहेत. विकी आणि कॅटरिनाचे लग्न राजस्थानमधील जिल्हा सवाई माधोपूरमध्ये असलेल्या सिक्स सेन्स बरवाडा फोर्टमघ्ये होत आहे आणि हे लग्न ९ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. लग्नाच्या ठिकाणापासून ते सेलिब्रिटींच्या यादीपर्यंत लग्नात सर्वकाही ओव्हर द टॉप आहे. या लग्न सोहळ्यामध्ये सर्व काही गोष्टी खूपच खास आहेत आणि अनोख्या पद्धतीने केल्या जात आहेत.

लग्नाच्या मेनूमध्ये असणार खास पदार्थ
भारतीय लग्नामधील एक खास भाग म्हणजे जेवण असते. विकी आणि कॅटरिनाच्या लग्नाच्या मेनूमध्ये काही खास पदार्थांचा समावेश आहे. त्यांच्या लग्नाच्या मेनूमध्ये लाईव्ह कचोरी, दही भल्ला, चाट स्टॉल, कबाब आणि पारंपारिक राजस्थानी पदार्थ यांचा समावेश आहे. या लग्नामध्ये इटालियन शेफने बनवलेल्या ५ थरांच्या केकचा देखील समावेश आहे.

लग्नामध्ये इटालियन शेफने बनवला ५ थरांचा केक
दाल बाटी चुरमा आणि पारंपारिक राजस्थानी जेवण विविध १५ प्रकारच्या डाळींचा समावेश आहे आणि लग्नातील केक खूप खास असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केक इटलीच्या एका शेफने बनवलेला आहे. केकचा रंग निळा आणि पांढरा असेल. हा केक ५ थरांचा टिफनी वेडिंग केक असेल. याव्यतिरिक्त पान, पाणीपुरी, इतर भारतीय खाद्य पदार्थांचे वेगवेगळे स्टॉल देखील असणार आहेत.

लग्नामध्ये खाजगी दलाची कडक योजना
विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्या लग्नाच्या ठिकाणी कडक सुरक्षा असणार आहे. हॉटेल सिक्स सेन्स फोर्ट बरवाडाची सुरक्षा खासगी सुरक्षा रक्षक आणि बाउंसर करत आहेत. हॉटेल आणि हॉटेलच्या आवारात एकदम कडक सुरक्षेची योजना करण्यात आली आहे. सवाई माधोपूर जिल्हा रणथंबोर राष्ट्रीय वाघ प्रकल्पसाठी प्रसिद्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाहुण्यांना टायगर सफारीसाठी घेऊन जाण्याची शक्यता आहे.

पाहुण्यांसाठी असणार अटी
संपूर्ण भागातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे आणि लोकांच्या हालचालींवरती निर्बंध घालण्यात आले आहेत, आणि लग्नाला सहभागी असणाऱ्या पाहुण्यांना कोव्हिडचे दोन्ही डोस झाले असले पाहिजेत. ज्या पाहुण्यांनी लस घेतली नाही, त्या पाहुण्यांसाठी आरटी पीसीआर टेस्ट करणे आवश्यक आहे. अशा सर्व अटी आहेत.

लग्नाचं रिसेप्शन होणार मुंबईमध्ये 
मिळालेल्या माहितीनुसार, जे पाहुणे किंवा मित्र लग्नाला येऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी विकी आणि कॅटरिना मुंबईमध्ये लग्नाचे रिसेप्शन ठेवणार आहेत.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!