झक्कास! एक- दोन नव्हे, तर तब्बल ६ मेव्हणींचा ‘दाजी’ होणार विकी कौशल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल


बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ  (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. या जोडप्याचा विवाह गुरुवारी (९ डिसेंबर) रोजी या दोघांचा विवाह राजस्थानातील सवाई माधोपुर याठिकाणी असलेल्या ‘सिक्स सेन्स फोर्ट’मध्ये पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर विकी आणि कॅटरिना या दोघांचेही कुटुंबीय विवाहस्थळी पोहोचले आहेत. या निमित्ताने आम्ही तुम्हाला काही खास माहिती देणार आहोत. ती अशी की, विकी कौशल विवाहानंतर सहा मेव्हणींचा दाजी बनणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कॅटरिनाच्या कुटुंबाबद्दल…

कॅटरिनाची आई आपल्या सहा मुली आणि एका मुलासह लग्नाच्या ठिकाणी पोहोचली आहे. कॅटरिनाच्या आईचे नाव सुजैन टरकोट असे आहे. सुजैन या पेशाने वकील असून त्या सामाजिक कार्य करण्यात देखील अग्रेसर असतात. त्या ब्रिटीश नागरिक होत्या, परंतु त्यांनी काश्मिरी नागरिक असलेल्या मोहम्मद कैफ यांच्याशी विवाह केला होता. कॅटरिना लहान असतानाच तिचे वडील मोहम्मद आणि आई सुजैन यांचा घटस्फोट झाला आणि ते वेगळे झाले.

सुजैन आणि मोहम्मद यांना एकूण आठ अपत्ये झाली. कॅटरिनासह सात बहिणी आणि त्यांचा एक भाऊ. यापैकी कॅटरिनाला तीन मोठ्या आणि तीन लहान बहिणी आहेत. या सात बहिनींचा एक भाऊ असून त्याचे नाव सेबास्टिएन टरकोट असे आहे.
स्टेफनी, क्रिस्टीन आणि नताशा या तीन मोठ्या बहिणी, तर मेलिसा, सोनिया व इसाबेल या तीन लहान बहिणी. यापैकी स्टेफनी आणि क्रिस्टिन या दोघी विवाहित आहेत, तर नताशा ही एक ज्वेलरी डिझायनर आहे.

मोहम्मद आणि सुजैन यांच्या घटस्फोटानंतर आठ भावंडांचा सांभाळ एकट्या सुजैन यांनी केला. आर्थिक अडचणींमुळे सुजैनने आपल्या मुलांना काही दिवस घरीच शिकवले. माझ्या मुलांवर मी अशा परिस्थितीत जगण्याची वेळ येऊ देणार नाही, असे कॅटरिनाने एका मुलाखतीत म्हटले होते.

कॅटरिनाच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून झाली होती. एका फॅशन शो दरम्यान चित्रपट निर्माते कैजाद गुस्ताद यांच्याशी कॅटरिनाची ओळख झाली. कैजाद यांच्या २००३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बुम’ या इंग्लिश-हिंदी इरोटिक चित्रपटात कॅटरिनाला त्यांनी कास्ट केले होते. या चित्रपटाला म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही, पण यानंतर कॅटरिनाला जाहिरातींसाठी ऑफर येऊ लागल्या.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!