Wednesday, February 4, 2026
Home कॅलेंडर भारीच! आजपासून ५२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात सुरुवात, पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मही सामील

भारीच! आजपासून ५२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात सुरुवात, पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मही सामील

आशिया खंडातील सगळ्यात जुना आणि भारतातील सगळ्यात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शनिवारी (२० नोव्हेंबर) रोजी सुरू झाला आहे. हा महोत्सव सलग ८ दिवस चालणार आहे. पहिल्यांदाच यामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म भाग घेणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी गोव्यामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा केला जाणार आहे. यामध्ये हॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक इस्तवान स्जाबो आणि मार्टिन स्कार्सेसी यांना ‘सत्यजित रे’ या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तसेच हेमा मालिनी आणि गीतकार प्रसून जोशी यांना ‘इंडियन फिल्म पर्सनालिटी ऑफ द इअर अवॉर्ड’ने सन्मानित केले जाणार आहे.

मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मला दिलेले आमंत्रण हे ५२ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी आहे. यामध्ये पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्म भाग घेणार आहे. यामध्ये नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम, झी५, वूट आणि सोनी लिव्ह यांना आमंत्रण दिले आहे. याचे आयोजन भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचा चित्रपट महोत्सव गोव्याचे सरकार आणि भारतीय चित्रपट उद्योगाच्या साहाय्याने केले जात आहे. (52 nd international film festival to start in Goa from Today OTT platform will also be included 1 st time)

सत्यजित रे यांचे या ५२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनेक चित्रपट दाखवले जाणार आहेत. ईएफएफआईच्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म प्रोड्युसर असोसिएशनची मान्यता आहे. दरवर्षी या चित्रपट महोत्सवात जगातील अनेक सर्वश्रेष्ठ चित्रपट दाखवले जातात. यावेळी अकॅडमी अवॉर्ड २०२२ साठी भारतातील तमिळ चित्रपट ‘कुझंगल’ला भारतीय पॅनोरमा या सेगमेंटमध्ये दाखवणार आहे.

भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म सध्या सर्वत्र पसरला आहे. त्यामुळे वेबसीरिज आणि अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केले जातात. ओटीटी प्लॅटफॉर्म या वर्षी या महोत्सवात सामील होणार आहे याची माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर त्यांनी शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) सर्वांना दिली. यावेळी ऍमेझॉन ओरिजिनलचा ‘छोरी’ हा चित्रपट देखील दाखवला जाणार आहे.

यावेळी या महोत्सवात अनेक चित्रपट दाखवले जाणार आहेत. गोव्यामध्ये होत असणाऱ्या या महोत्सवात देशातील ९९% पिन कोडला कव्हर केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अरे व्वा! मेघराज राजेभोसले यांची फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

-उर्मिला कोठारेने केला एरियल डान्स, व्हिडिओ पाहून हटणार नाहीत तुमच्याही नजरा!

-अर्रर्र! कार्यादरम्यान गायत्रीला झाली दुखापत, ‘बिग बॉस’ने दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण आदेश

हे देखील वाचा