अरे व्वा! मेघराज राजेभोसले यांची फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड


अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या गोवा येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली असून फेडरेशनच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध चित्रपट निर्माते टी. पी. अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे.

फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया ही देशभरातील प्रादेशिक व राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या विविध संघटनांची शिखर संस्था आहे. शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) गोवा येथे देशभरातील विविध संघटनांच्या अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मेघराज राजेभोसले यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट ही देशातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेली प्रमुख संस्था आहे. राजेभोसले यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने मराठी चित्रपटसृष्टी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू मला परवानगी दिली म्हणून…’, सुंदर कॅप्शनसह स्मिता तांबेने केला तिच्या मुलीसोबतचा फोटो शेअर

-तुटले महाराष्ट्रातील तमाम तरुणांचे हृदय! ‘महाराष्ट्राची क्रश’ ऋता दुर्गुळे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट

-अभिनेत्री ऋतुजा बागवेची सुंदरता अशी की, पाहून चाहताही म्हणाला, ‘दीपिका पदुकोणचे मराठी व्हर्जन’


Latest Post

error: Content is protected !!