Wednesday, July 3, 2024

काय असतो ग्रॅमी अवॉर्ड? नामांकन प्राप्त झालेल्या यादीत एर आर रहमान आणि गुलजार यांचेही नाव

65th Grammy Awards: कलाक्षेत्रात भरीव काम करणाऱ्यांची जगभरात ओळख असते. परंतु जगभरात अशा अनेक संस्कृती आहेत जिथे विविध कला प्रकार आहेत. अशा स्थितीत सर्वच लोकांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. सोशल मीडियाच्या युगातही हे करणं सोपं नाही. परंतु पुरस्कार सोहळे हा कलेचा असा उत्सव आहे जिथे जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिभावंतांचं कौतुक केलं जातं आणि त्यांच्या कौशल्यासाठी त्यांना नामंकन देऊन ते प्रेक्षकांच्या ओळखीस उतरतात आणि त्यांच्या कामाला ओळखलं जातं. संगीत विश्वातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे ग्रॅमी अवॉर्ड्स. या पुरस्कारासाठी जगभरातील संगीतकार सहभागी होतात. ज्याप्रमाणे चित्रपटांसाठी ऑस्कर हा सर्वात मोठा सन्मान मानला जातो, त्याचप्रमाणे संगीतातील सर्वोत्तम कलाकारांना ग्रॅमी पुरस्कार दिला जातो. भारतातूनही असे अनेक कलाकार आहेत ज्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. तर आपण अशाच गायकांची यादी पाहणार आहोत ज्यांना ग्रॅमी नामंकन प्राप्त झालं आहे.

1) पंडित रवि शंकर (Pandit Ravi Shankar): रविशंकर हे भारतीय सितारवादक आणि संगीतकार होते. त्यांनी आपल्या गायिकीने अनेक लोकांना मंत्रमुग्ध केलं आहे. त्यांच्या आवाजामध्ये एक वेगळीज जादू आहे. त्यांच्या आवाजाने पुर्ण जगावर भुरळ घातली आहेत. रवी शंकर यांनी हे नामांनकन 4 वर्ष वेगवेगळ्या अवॉर्ड कार्यक्रमात मिळालं आहे. आणि 2013 साली त्यांना ग्रॅमी लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड सन्मानित केलं आहे.

2. झुबिन मेहता (Zubin Mehta) : झुबिन मेहता हे पाश्चात्य शास्त्रीय संगीताचे भारतीय कंडक्टर आहेत. त्याशिवाय त्यांना संगित जागामधील मोठं स्थानही मानलं जातं. त्यांनी एकूण 23 वेळा ग्रॅमी अवॉर्डसाठी नॉमिनेट केलं आहे. ज्यापैकी 5 वेळा त्यांना सन्मान प्राप्त झाला आहे.

3) टी एच विनायकराम (T. H. Vinayakram): टी एच विनायकराम हे साउथमधील दिग्गज संगितकार आणि म्युजिशियन आहेत. त्यांना एकवेळा ग्रॅमी अवर्ड प्राप्त झाला आहे. म्युजिशियन घाटम जे वाजवतात त्याचा आकार मटक्यासारखा आहे. त्याचा आवाज एकल्यानंतर माणूस वेगळ्यात जागात जातो. विनु विनायकराम यांना जाकिर हुसैन सोबत जुगबंदीमध्येही सन्मान मिळाला होता.

4) ए आर रहमान (A. R. Rahman) : एर आर रहमान यांनी जगभरात आपल्या किर्तीचा डंका गाजवला आहे. त्यांनी आपल्या संगीताने जगला मंत्रमुग्ध केलं आहे. त्यांना दोनवेळेस ग्रॅमी अवर्डनेही सन्मिनित केलं आहे. ए आर रहमान यांना जय हो या गाण्यासाठी ग्रॅमी अवॉर्ड मिळाला होता.

5) गुलजार (Gulzar) : गुलजार यांच्या गाण्यांना जेव्हा सांगित मिळतं तेव्हा अनेकांच्या तोंडातून जय हो असंच निघतं. त्यांच्या शायरी आणि गाण्यांची क्रेज जगभरात पसरली आहे. गुलजार यांना देखिल जीनियस फॉर्मेशनसाठी ग्रॅमी अवर्डने सन्मानित केलं आहे.

6) जाकिर हुसेन (Zakir Hussain) : उस्ताद जाकीर हुसेन हे भारतीय तबला वादक, संगीतकार, तालवादक, संगीत निर्माता आणि चित्रपट अभिनेते आहेत. तबलाच्या तालबद्धसाठी पूर्ण जग त्याचं फॅन आहे. त्यांना 2 वेळेस या अवॉर्डने सन्मानित केलं आहे. संगित क्षेत्रामला मोठ्या यशापर्यत पोहोचवण्याासाठी त्यांचं मोठं योगदान आहे.

7) रिकी केज (Ricky Kej): रिकी केज यांना 2 वेळा हे नामांकन प्रप्त झालं आहे. त्यांना 2015 मध्ये विंड्स ऑफ समसारा आणि 2022 मध्ये डिवाइन या टायटल गाण्यासाठी ग्रॅनी अवर्डने सन्मानित केलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
VIDEO| राजू, रॅन्चो आणि फरहानची 3 इडियट्स जोडी पुन्हा एकत्र, पाहाच व्हायरल व्हिडिओ
माझे संगीत शोधत आहे, कायमचे आणि नेहमी! स्मिता गोंडकरचे लेटेस्ट फोटो

हे देखील वाचा