मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या आणि महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज (शुक्रवार, 22 जुलै) रोजी करण्यात आली. हिंदीसह, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना या पुरस्कारांसाठी नामांकने दिली जातात. यंदा 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. ( 68th National Film Awards for Marathi films and artists )
यावेळी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर अनेक मराठी चित्रपटांनी बाजी मारली. मराठी चित्रपट आणि कलाकार यांना मिळालेले पुरस्कार खालीलप्रमाणे;
1. किशोर कदम – ‘अवांछित’ आणि ‘गोदाकाठ’साठी विशेष पुरस्कार
2. राहुल देशपांडे – ‘मी वसंतराव’साठी उत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार
3. गोष्ट एका पैठणीची – उत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार
4. ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ सिनेमाला लोकप्रिय हिंदी चित्रपटाचा पुरस्कार (दिग्दर्शक ओम राऊत)
5. ‘जून’ सिनेमासाठी सिद्धार्थ मेनलला पुरस्कार
अधिक वाचा –
ब्रेकिंग! गायक राहुल देशपांडे यांना राष्ट्रीय पुरस्कार
रणवीर, लेका काय केलंस हे? चार पैशांसाठी आख्खा ‘नग्न’ झाला अभिनेता, बघा Viral फोटो