कलाकार हे त्यांचा सिनेमा हिट होण्यासाठी वर्षातून मोजकेच सिनेमे करतात. त्यासाठी ते योग्य ती स्क्रिप्ट निवडतात, त्यासाठी स्वत: ला झोकून देतात. सिनेमा हिट होण्यात त्यांचे मोलाचे योगदान असते. असाच एक दाक्षिणात्य अभिनेता आहे, ज्याने त्याच्या सिनेमासाठी आयुष्यातील जवळपास 4 ते 5वर्षे दिली होती. त्याने दिलेला वेळ आणि दाखवलेले समर्पण त्याच्या सिनेमासाठी फायदेशीर ठरले आणि सिनेमाने छप्परफाड कमाईदेखील केली. तो अभिनेता इतर कुणी नसून सुपरस्टार प्रभास आहे. मात्र, प्रभासला या सिनेमादरम्यान त्याला हे सर्व सोडून जावेसे वाटत असल्याचे त्यानेच सांगितले होते. काय होता तो किस्सा जाणून घेऊया…
प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा ‘बाहुबली: द बिगिनिंग’ हा सिनेमा 10 जुलै, 2015 रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमा प्रदर्शित होऊन आता 7 वर्षे झाली. यशाचे शिखर गाठणाऱ्या या सिनेमाला तयार होण्यासाठी तब्बल 2 वर्षांचा कालावधी लागला होता. यामुळे दिग्दर्शक राजामौली आणि क्रू मेंबरसोबतच सिनेमाची स्टारकास्टही चिंतेत होती.
खुद्द प्रभासनेच केलेला खुलासा
‘बाहुबली: द बिगिनिंग’ या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या एक महिन्यापूर्वी जून 2015 मध्ये प्रभासने याचा खुलासा केला होता. तो म्हणाला होता की, एक काळ असाही आला होता, जेव्हा त्याला हा सिनेमा सोडायचा होता. प्रभास म्हणाला होता, “250 दिवसांनी मी म्हणालो ‘बस! पुरे झाले, आता चित्रपट पाहू.’ मी राजामौलींना फोन केला आणि म्हणालो, ‘मी वेडा झालो आहे, मला आतापर्यंत जितका बनलाय तो सर्व चित्रपट बघायचा आहेत.’ जेव्हा मी क्लिप पाहिल्या, तेव्हा मला खात्री पटली की होय, सर्वकाही ठीक होईल.”
View this post on Instagram
‘बाहुबली’ सिनेमाचा विक्रम
आतापर्यंत बॉलिवूडमध्ये100कोटींची कमाई करणारे अनेक सिनेमे झाले आहेत. मात्र, राजामौली यांनी ‘बाहुबली’च्या रुपात असे काही बनवले होते, ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता. ‘बाहुबली’ हा भारतातील पहिला वहिला सिनेमा होता, ज्याने अवघ्या 35तासांमध्ये 100 कोटींची कमाई केली होती. साधारणत: इतर सिनेमे 100 कोटींची कमाई करण्यासाठी 3-4 दिवस घेतात. मात्र, बाहुबली सिनेमाने अवघ्या 35 तासांमध्ये हा पराक्रम गाजवला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मलायका अरोरा झाली धोक्याची शिकार; अभिनेत्रीच्या बहिणीनेच तिच्या नकळत केलं ‘असं’ काही
मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा