Thursday, July 18, 2024

मलायका अरोरा झाली धोक्याची शिकार; अभिनेत्रीच्या बहिणीनेच तिच्या नकळत केलं ‘असं’ काही

अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिची बहीण अमृता अरोरा अनेकदा सोशल मीडियावर एकत्र दिसतात. दोन्ही बहिणींचे ट्यूनिंग खूपच मस्त आहे आणि ते बऱ्याचदा त्यांच्या गर्ल गँगसोबत देखील दिसतात. पण मलायका अरोराने बहीण अमृता अरोरासोबत एक व्हिडिओ बनवला आहे, जो चांगलाच पसंत केला जात आहे. मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मलायकाला तिची बहीण अमृताने फसवले आहे.

मलायका अरोराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यावर तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. अशाप्रकारे चाहते तिचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पसंत करत आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात व्हायरल ही करत आहेत. या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, बहीण अमृता मलायका अरोराला खूप वेगाने ढकलते आणि मलायका तिचा तोल सांभाळू शकत नाही. (Actress Malaika Arora was pushed by her sister and posted a video)

अभिनेत्री मलायका अरोराने खास गाण्यांद्वारे बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने ‘ छैय्या छैय्या’, ‘अनारकली’ आणि ‘मुन्नी बदनाम’ सारख्या सुपरहिट गाण्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. यासोबतच तिच्या नृत्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर दिसत आहेत. तसेच, मलायका हिने ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ आणि ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ सारखे शो जज केले आहेत.

मलायका अरोराने आपल्या कारकिर्दीची सुरूवात एक मॉडेल म्हणून सुरुवात केली होती. तिने मॉडेलिंगनंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याचबरोबर तिने अलिकडेच काही तरुणींना सल्ला दिला आहे की, मॉडेलिंगमधून पैसे कमवा. मलायका अरोराने काही दिवसांपूर्वीच अभिनेता अरबाज खानकडून घटस्फोट घेतला आहे. आता ते दोघे वेगळे राहतात. तर त्यांना एक मुलगा देखील आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही नक्की वाचा-
मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा
अरबाज खानच्या ‘या’ सवयीला कंटाळली होती मलायका अरोरा, स्वत: केला खुलासा

हे देखील वाचा