Thursday, June 12, 2025
Home अन्य सलमान खानसोबत काम करुनही ‘या’ अभिनेत्रीला मिळाले नाही चित्रपट क्षेत्रात यश, वाचा तिची कहाणी

सलमान खानसोबत काम करुनही ‘या’ अभिनेत्रीला मिळाले नाही चित्रपट क्षेत्रात यश, वाचा तिची कहाणी

बॉलिवूडचा भाईजान त्याच्या चित्रपटांसाठी तर प्रसिद्ध आहेच, त्याचबरोबर तो अनेक अभिनेत्रींच्या अभिनय कारकिर्दिला प्रारंभ करून देण्यातही महत्वाची भूमिका निभावली आहे. अभिनेत्री कॅटरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, असीन असे अनेक अभिनेत्रींना भाईजानच्या चित्रपटातून ब्रेक मिळाला असून सध्या या अभिनेत्री चित्रपट क्षेत्रात प्रचंड यश मिळवत आहेत,म्हणूनच सलमान खानसोबत चित्रपट करायला सगळयाच अभिनेत्री उत्सुक असतात. मात्र एक अभिनेत्री अशीही आहे जिने भाईजानच्या चित्रपटात त्याच्या पत्नीची भूमिका साकारुनही अभिनय क्षेत्रात जास्त यश मिळवू शकली नाही, कोण आहे ही अभिनेत्री चला जाणून घेऊ. 

अभिनेता सलमान खानने ९० च्या  दशकात अनेक  अभिनेत्रींसोबत काम केले आहे,यामध्ये अभिनेत्री शीबाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. शीबाने सलमान खानच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटात त्याच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतूक  करण्यात आले होते. मात्र सलमान खानच्या चित्रपटात काम करूनही या अभिनेत्रीने  चित्रपट  जगतातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे तिच्या या निर्णयाचे सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

सध्या शीबा चित्रपट क्षेत्रात झळकत नसली तरी सोशल मीडियावर मात्र नेहमी सक्रिय असते. आपले नवनवीन फोटो आणि व्हिडिओ ती चाहत्यांशी शेअर करत असते.  तिच्या या पोस्टची सोशल मिडियावर चर्चा होत असते. यामध्ये ती तिचे फिटनेसचे आणि व्यायाम करतानाचे फोटो शेअर करत असते, यामधील तिची फिगर आणि फिटनेस पाहून आजही तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे. आजही ती तितकीच फिट आणि बोल्ड दिसत असल्याचे या फोटोत दिसत आहे. शिबाने १९९१ मध्ये आलेल्या ‘ये आग कब बुझेगी’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. तिने ‘प्यार का साया’, ‘मिस्टर बॉंन्ड’,  ‘हम है कमाल के’, ‘तीसरा कौन’, ‘सुरक्षा’ अशा या चित्रपटात काम केले आहे, तिच्या या चित्रपटातील भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या.

 

हे देखील वाचा