×

‘टायगर ३’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित, या दिवशी येणार भाईजानचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा चित्रपट म्हटले की त्याच्या चाहत्यांसाठी जणू पर्वनीच असते. भाईजानचा प्रत्येक चित्रपट त्याच्या नावावरच सुपरहीट होत असतो. याआधी सलमान खानच्या ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांनी दमदार यश मिळवले होते. यामधील सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या जोडीने सगळ्यांनाच वेड लावले होते. चित्रपटातील दोघांच्या अभिनयाचे कौतुक तर झालेच त्याचबरोबर या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार गल्ला जमवला होता. या चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजेच ‘टायगर ३’ चित्रपटाची घोषणा केली आहे,त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आता या बातमीने आनंद झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सलमान खान (salman khan) हा हिंदी चित्रपट जगतातील आघाडीच्या अभिनेत्यापैकी एक आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि बॉडीने तो या क्षेत्रात अनेक वर्ष निर्विवाद वर्चस्व गाजवताना दिसत आहे. सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या दमदार अभिनयाने एक था टायगर चित्रपटाचे दोनही भाग याआधी सुपरहीट ठरले होते. आता दोघांचा बहुचर्चित ‘टायगर ३’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याची घोषणा यशराज फिल्म्सने केली आहे. तर सलमान खान आणि कॅटरिना कैफनेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून याची माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. सोबतच चित्रपटाचा टिजरही प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये सलमान आणि कॅटरिनाचा डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे.

‘टायगर ३’ चित्रपटाची यशराज फिल्म्सकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा बहुचर्चित चित्रपट पुढच्या वर्षी २१ एप्रिल २०२३ ला ईदच्या शुभ मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबात आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून माहिती देताना सलमान खानने “सगळ्यांनी काळजी घ्या, हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषेत ‘टायगर ३’ चित्रपट तुमच्या भेटीला येणार असल्याची,” माहिती दिली आहे.तर अभिनेत्री कॅटरिनानेही “पुन्हा एकदा जोया आणि टायगरची जोडी तुमच्या भेटीला आहेत, त्यासाठी सज्ज राहा” असा संदेश दिला आहे. आता त्यांच्या चाहत्यांना या बहुचर्चित चित्रपटाची प्रतिक्षा लागली आहे.

Latest Post