Friday, July 5, 2024

अनन्या पांडे आणि ईशान खट्टर एकमेकांना करतायेत डेट? व्हायरल व्हिडिओ देतोय साक्ष

बाॅलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) ही सध्या तिच्या ‘गहराइयां’ या चित्रपटामुळे चर्चेचा विषय बनली आहे. ती तिच्या व्यावसायिक जीवनासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. ती आता २३ वर्षाची आहे. काही वृत्तानुसार, ती शाहीद कपूरचा भाऊ ईशान खट्टरला (Ishaan Khatter) डेट करत आहे. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या डेटिंगच्या चर्चा खूप दिवसांपासून रंगल्या आहेत. परंतु ते दोघेही यावर भाष्य करणे नेहमीच टाळतात. नुकतीच ती शाहीद कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टित गेली होती. तिथे हे दोघे लव्ह बर्ड मस्ती करताना दिसले.

शाहिद कपूरने (Ishaan And Ananya) त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीची एक रील शेअर केली आहे. ज्यामध्ये ती आणि ईशान एकमेकांंमध्ये हरवलेले दिसत आहेत. दोघांंनी एकमेकांचा हात धरला आहे. व्हिडिओमध्ये दोघांचे काही फोटो आहेत ज्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शाहिद कपूरचाही तिच्यासोबत एक फोटो आहे, ज्यामध्ये सर्वजण खूप आंनदी दिसत आहेत. हे फोटो पाहून असे म्हणता येईल की, ही केवळ मैत्री नव्हे तर एका बाजूने शाहिदने अनन्या आणि ईशानला (Ishaan And Ananya) यांच्या नात्यालाही मान्यता दिली आहे असे म्हणता येईल.

पहिल्यांदाच ईशान आणि अनन्याचे (Ishaan And Ananya) एकत्र फोटो समोर आले होते. ‘खाली-पीली’ चित्रपटानंतर त्यांच्या डेटीगच्या चर्चा रंगल्या होत्या. या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले आहे. कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिची ‘गहराइयां’ हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य कारवा हे मुख्य भूमिकेत आहेत. शकुन बत्रा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात तिचा अभिनय चांगलाच गाजला आहे. विजय देवरकोंडासोबत तिचा ‘लायगर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हा तिचा मोठा प्रोजेक्ट असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा 

हे देखील वाचा