Friday, May 1, 2026
Home अन्य Shocking | स्पीडबोटीने फिरायला गेली होती ‘ही’ अभिनेत्री; पोहायला येत होते, मग का गमवावे लागले प्राण?

Shocking | स्पीडबोटीने फिरायला गेली होती ‘ही’ अभिनेत्री; पोहायला येत होते, मग का गमवावे लागले प्राण?

लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायला किती आवडते हे कोणालाच सांगण्याची गरजच नाही. वीकेंड असो वा कोणतीही सुट्टी लोक आपले सुट्टीचे दिवस आनंदात घालवण्यासाठी आपल्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत बाहेर छान अशा लोकेशनवर फिरायला जातात. मात्र कधी कधी फिरणे जीवघेणे ठरते. असे म्हणतात की, वेळ कधीच कोणाला सांगून येत नाही. असेच काहीसे एका अभिनेत्रीच्या बाबतीत घडले. ही अभिनेत्री घरातून फिरण्यासाठी बाहेर पडली, पण अचानक तिच्यासोबत असा अपघात झाला की, ती आपल्या घरी परत येऊ शकली नाही. अभिनेत्रीसोबतच्या प्रवासादरम्यान हा अपघात झाला. या प्रवासात ती एका स्पीडबोटीवरून पाण्यातून जात होती, मात्र तेव्हा तिला प्राण गमवावे लागले.

अभिनेत्री अचानक बोटीतून झाली गायब
माध्यमांतील वृत्तानुसार, निदा पचरवीराफोंग (Nida Patcharaweeraphong) तिच्या मैत्रिणींसोबत २४ फेब्रुवारी रोजी चाओ फ्राया नदीतून बँकॉकमध्ये बोटीतून जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, थाय अभिनेत्री निदा पचारावियरफोंग बोटीच्या मागच्या बाजूला बसली होती. अचानक निदा पाण्यात पडली आणि तिच्याबद्दल कोणालाच कळले नाही.

पाण्यात २० मिनिटे घेण्यात आला अभिनेत्रीचा शोध
अभिनेत्री बोटीत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी स्पीडबोटीच्या सहाय्याने सुमारे २० मिनिटे पाण्यात तिचा शोध घेतला. मात्र नंतर स्थानिक अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. त्यानंतर ३० गोताखोरांची टीम परिसरात शोधासाठी पाठवण्यात आली.

भावाने ओळखले बहिणीला
निदाचा भाऊ देस देजाब शोध आणि बचाव मोहिमेत सामील झाला. पाण्यात काहीतरी तरंगताना दिसले. त्यानंतर अभिनेत्रीची ओळख पटली.

दुःखी झाले कुटुंब
निदाचा भाऊ देस देजाब म्हणाला की, “कुटुंबातील प्रत्येकजण ज्या वेदनातून जात आहे ते असह्य आहे. आम्ही आमच्या बहिणीवर खूप प्रेम करत होतो आणि ती आम्हाला खूप आनंद द्यायची. मी प्रत्येकाच्या प्रयत्नांबद्दल आभार मानू इच्छितो. मी आता तिला घरी नेण्यासाठी आलो आहे.”

निदा चांगले पोहू शकत होती
निदाची आई पानिडा सिरिउथियोथिन म्हणाली की, त्यांची मुलगी चांगले पोहू शकत होती आणि जे घडले त्यावर विश्वास बसत नाही.

हेही  वाचा –

हे देखील वाचा