Friday, July 5, 2024

अगं कंगना तुझ्या जिभेला काही हाड? असे म्हणत ८० वर्षाच्या आजींनी कंगनाला झापले

आपल्या बिनधास्त विधानांसाठी सर्वश्रुत असलेली अभिनेत्री म्हणजे कंगना राणावत. कंगना नेहमीच वादग्रस्त विधानं करून वाद ओढवून घेत असते. यावेळी देखील कंगनाने सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासोबत या जोडून ज्या आजींची मस्करी केली होती. त्या आजींनी आता कंगनाला तिच्या मस्करी बद्दल फटकारले आहे.

८० वर्षाच्या मोहिंदर कौर ह्या भटिंडाच्या बहादरगड गावाच्या रहिवासी आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये कंगनाला तिच्या चुकीच्या विधानाबद्दल सुनावले. त्या म्हणाल्या, ” कंगनाला काय माहित शेती काय असते? ती वेडी आहे. ती जे काय बोलली त्या बद्दल मी तिचा धिक्कार करते. कंगनाला काय माहित शेतकऱ्यांची कमाई काय आहे. जेव्हा भर उन्हात घाम गाळल्यानंतर, शरीरातील रक्त गरम झाल्यानंतर तेव्हा कुठे थोडे पैसे मिळतात. शेतीतून पैसे मिळवणे खूप कठीण आहे. मी कंगनाला माझ्या शेतात काम करण्यासाठी ठेऊ शकते. कदाचित तेव्हा तिला १०० रुपये मिळवण्यासाठी करावा लागणार संघर्ष समजेल. शेवट आजींनी कंगनाला गुरबानीचा धडा देत, एक शिकवण दिली की, कधीही कोणाबद्दल वाईट बोलू नये.”

तत्पूर्वी कंगनाने मोहिंदर कौर या आजींचा फोटो शाहिनबागच्या घटनेसोबत जोडत ट्विट केले होते. काही वेळानंतर कंगनाने ते ट्विट काढून टाकले होते, पण तोपर्यंत ते ट्विट सर्वत्र वायरल झाले होते.

हे देखील वाचा