Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड बॉलीवूडमधून कुठे गायब झाल्या ‘या’ अभिनेत्री, ज्यांच्या प्रत्येक सीनवर एकेकाळी वाजत होत्या शिट्ट्या

बॉलीवूडमधून कुठे गायब झाल्या ‘या’ अभिनेत्री, ज्यांच्या प्रत्येक सीनवर एकेकाळी वाजत होत्या शिट्ट्या

80च्या दशकातील बॉलीवूडला क्वचितच कोणी विसरले असेल. आजच्या टीनएजर्सना त्या काळातील नायिका माहीत नसतील, पण त्या दशकातील लोकांना विचारले तर त्यांच्या आवडत्या नायिकांचा उल्लेख करताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसते. 80च्या दशकात, पडद्यावर नायिका दिसल्या की लगेचच सिनेमागृहात टाळ्या आणि शिट्ट्या वाजू लागल्या.

अमृता सिंग
चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध नायिका अमृता सिंग ही सैफ अली खानची माजी पत्नीही राहिली. ती बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानची आई आहे. एकेकाळी तिचे अभिनयच नाही तर सौंदर्यही प्रसिद्ध होते. आज ती लाइमलाइटपासून दूर गेली आहे. आणि तिचा लुकही बदलला आहे.

रती अग्निहोत्री
बॉलिवूडच्या दमदार बोल्ड अभिनेत्रींपैकी एक असलेल्या रती अग्निहोत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. सिंग इज ब्लिंग या चित्रपटात ती अखेरची अक्षय कुमारच्या आईच्या भूमिकेत दिसली होती. 1981मध्ये रिलीज झालेल्या ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर तिला बरीच ओळख मिळाली. पण आता ही अभिनेत्री काय करते आणि कुठे आहे याची कोणालाच कानोकान खबर देखील नाहिये.

अनिता राज
आपल्या बोल्ड आणि सुंदर स्टाईलने लोकांच्या हृदयाची धडकन करणाऱ्या अनिता राजने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. वैयक्तिक आयुष्यात व्यस्त असलेली अनिता राज सध्या लाइमलाइटपासून पूर्ण अंतर राखत आहे.

मंदाकिनी
तसेच राम तेरी, गंगा मैली या चित्रपटातून रातोरात स्टार बनलेल्या मंदाकिनीला पाहण्यासाठी अनेकांचे डोळे आजही आसुसलेले असतात, पण ती आता क्वचितच पाहायला मिळते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मोठ्या पडद्यावरुन अचानक गायब झाले ‘हे’ बॉलीवूड कलाकार, कुठे गेले याचा कोणालाच पत्ता नाह

‘या’ सुपरस्टारला हॉस्पिटलमध्ये साजरा करावा लागला वाढदिवस; मेडिकल स्टाफसोबतचा फोटो शेअर करत दिली अपडेट

हे देखील वाचा