×

सेल्फी काढण्यासाठी फॅनने अक्षय कुमारचे डोके धरून खेचले त्याला मागे, हे पाहून चिडला खिलाडी कुमार

कलाकार आणि त्यांचे फॅन्स यांचे आजपर्यंत आपण वेगवेगळे किस्से कहाण्या ऐकल्या आहेत. फॅन्स त्यांच्या आवडत्या कलाकरांना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. कलाकारांचा पाठलाग करणे, त्यांना सेटवर जाऊन भेटणे आदी अनेक प्रकारे ते कलाकारानं भेटण्याचा प्रयत्न करतात. मात्र कधी कधी हे करण्याच्या नादात ते आपण आपल्या मर्यादा ओलांडत आहे हे देखील विसरून जातात. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे संपूर्ण जगात करोडो चाहते आहेत. जे त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. सध्या अक्षय कुमारचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक फॅन त्याच्यासोबत सेल्फी घेताना दिसत आहे.

मात्र या व्हिडिओमध्ये अक्षयसोबत सेल्फी घेणारा फॅन हे विसरले की अक्षय कुमार हा कलाकार असला तरी एक मनुष्य आहे. व्हिडिओमध्ये अक्षय त्याच्या फॅन्सच्या गर्दीतून अक्षय कुमार वाट काढत चालताना दिसत आहे. त्याच्यासोबत त्याचे बॉडीगार्ड देखील दिसत असून, फॅन्स त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आणि त्याला टच करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अक्षय देखील आनंदाने सर्वानाच भेट असल्याचे दिसते. तेवढ्यात एक फॅन अक्षय चालत असताना वरून त्याचे डोके धरून त्याला मागे खेचतो आणि कॅमेरा त्याच्या चेहऱ्याजवळ नेऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतो.

View this post on Instagram

A post shared by Rupesh✨ (@sarcaster_rupesh)

फॅनचे हे कृत्य पाहून अक्षयला खूपच राग येतो आणि तो त्याचा हाथ पकडून त्याला नाही म्हणताना दिसतो. सध्या अक्षयचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, त्यावर लोकांच्या हजारो कमेंट्स आणि भरपूर लाईक्स येत आहेत. अनेकदा कलाकारांना फॅनच्या अशा कृत्याचा अनुभव येत असतो. तत्पूर्वी अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर काही दिवसांपूर्वीच त्याचा बच्चन पांडे हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता लवकरच त्याचा पृथ्वीराज सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे. नुकतेच अक्षयने इंडस्ट्रीमध्ये ३० वर्ष पूर्ण केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post