×

रश्मिका मंदान्ना ७० किलो वजन उचलून देत आहे फिटनेस गोल, पाहा व्हिडिओ

रश्मिका मंदान्ना (Rashmika mandanna) तिच्या अभिनयासोबतच तिच्या फिटनेसमुळे देखील चर्चेत असते. ती एक फिटनेस फ्रिक मुलगी आहे. योग असो, कार्डिओ असो किंवा जिममध्ये वर्कआउट असो, रश्मिका सर्व प्रकारच्या व्यायामाचा आनंद घेते. त्याचबरोबर ती स्वत: तंदुरुस्त राहण्यासोबतच तिच्या चाहत्यांना फिटनेससाठी प्रेरित करते. ती अनेकदा तिचे फिटनेस व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. आता पुन्हा एकदा रश्मिका मंदान्नाच्या वर्कआऊटच्या व्हिडिओने सर्वांनाच हैराण केले आहे.

रश्मिका मंदान्नाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती स्क्वॅट्स करताना ७० किलो वजन उचलताना दिसत आहे. अभिनेत्रीने केशरी टाय-डाय लेगिंगसह पिवळा क्रॉप टॉप घातला आहे. तसेच रश्मिकाने तिचे केस बनमध्ये बांधले आहेत. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शन लिहिले की, ‘७५ किलो एका पायावर, पूर्ण झाले. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे सध्या सर्वत्र तिच्या या व्हिडिओची आणि तिच्या व्यायामाची चर्चा चालू आहे.

View this post on Instagram

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

रश्मिका मंदान्नाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘मिशन मजनू’ या बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. हा एक स्पाय-थ्रिलर चित्रपट असेल. याशिवाय रश्मिका वरुण धवनसोबत एका अनटाइटल्ड चित्रपटातही दिसणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदान्नाकडे साऊथ सिनेसृष्टीतील ब्लॉकबस्टर सिनेमा ‘पुष्पा‘ (pushpa) चा सिक्वेल ‘पुष्पा: द रुल’ देखील आहे. या चित्रपटाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या चित्रपटात लोकांना पुन्हा एकदा अल्लू अर्जुन (allu arjun) आणि रश्मिकाची अप्रतिम जोडी पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post