Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड वय फक्त आकडा! आजीबाईंनी 93व्या वर्षी लावले ‘बदन पे सितारे लपेटे हुए’ गाण्यावर ठुमके, पाहा व्हिडिओ

वय फक्त आकडा! आजीबाईंनी 93व्या वर्षी लावले ‘बदन पे सितारे लपेटे हुए’ गाण्यावर ठुमके, पाहा व्हिडिओ

गाणं कुठलंही असो डान्सची आवड असली की, लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकजण थिरकताना दिसतो. असेच काहीसे आता पाहायला मिळाले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात 93वर्षीय आजीबाई डान्स करताना दिसत आहेत. त्यांना डान्स करताना पाहून त्यांचे कुटुंबीयदेखील भलतेच खुश होताना दिसत आहेत. या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

आजीबाईंचा डान्स… तोही 93वर्षांच्या वयात
खरं तर, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत 93वर्षीय आजीबाई एकदम मस्तीच्या मूडमध्ये डान्स करताना दिसत आहेत. त्या शम्मी कपूर (Shammi Kapoor) आणि वैजयंती माला (Vyjayanthimala) यांच्या प्रसिद्ध ‘बदन पे सितारे लपेटे हुए’ (Badan Pe Sitare Lapete Huye) या गाण्यावर डान्स करत आहेत. व्हिडिओत दिसते की, त्यांच्या कुटुंबातील सदस्यही त्यांच्यामागे डान्स करत आहेत. या व्हिडिओत आजीबाईंनी नाइटी परिधान केली आहे. या व्हिडिओची सुंदरता स्पष्ट होत आहे. 93व्या वयात आजीबाईंनी केलेला डान्स प्रत्येकाला भावत आहे. तसेच, हा व्हिडिओ चाहते सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

आजीबाईंचे केस पांढरे झाले आहेत. मात्र, त्यांची उत्कटता पाहण्यासारखी आहे. त्या हुबेहूब डान्स स्टेप्स कॉपी करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ नरेंद्र सिंग नावाच्या एका ट्विटर युजरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “93वर्षांच्या वयात आजीबाईंवर शम्मी कपूर यांचा जादू चढला. बदन पे सितारे लपेटे हुए गाण्यावर थिरकल्या आजी.”

या व्हिडिओवर कमेंट करत एकाने लिहिले की, “खूप प्रेम आजीबाई.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “आजीबाई खूपच सुंदर.” आणखी एकजण म्हणाला की, “आनंदी राहण्यासाठी कोणतेही वय नसते.”

‘प्रिन्स’ सिनेमातील गाणे
खरं तर, हे गाणे 1969 मध्ये रिलीज झालेल्या ‘प्रिन्स’ या सिनेमातील आहे. या गाण्याचे संगीत दिग्दर्शक शंकर जयकिशन हे आहेत. या गाण्याला मोहम्मद रफी (Mohammed Rafi) यांनी आपला आवाज दिला होता. हे गाणे शम्मी कपूर आणि वैजयंती माला यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. (93 year old dadiji did fantastic dance on actor shammi kapoor song badan pe sitaare lapate huye see video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अरे तुमच्या ताटात जेवण नाहीये…’, शाहरुखच्या ‘पठाण’ला ट्रोल करणाऱ्यांवर बरसली प्रसिद्ध अभिनेत्री
‘इतके पैसेवाले असूनही कोर्टात लग्न केले आणि आम्ही मध्यमवर्गीय…’, नवविवाहित अभिनेत्री जोरदार ट्रोल

हे देखील वाचा