Thursday, June 13, 2024

‘इतके पैसेवाले असूनही कोर्टात लग्न केले आणि आम्ही मध्यमवर्गीय…’, नवविवाहित अभिनेत्री जोरदार ट्रोल

छोट्या पडद्यावरील ‘साथ निभाना साथिया‘ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे देवोलीना भट्टाचार्जी होय. देवोलीना हिने या मालिकेत ‘गोपी बहू’ हे पात्र साकारून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. या मालिकेनंतर तिने अनेक शोमध्ये भाग घेतला. देवोलीनाचा सोशल मीडियावरही चांगलाच वावर आहे. तिने नुकतेच जिम ट्रेनर शाहनवाज शेख याच्यासोबत संसार थाटला. त्यांंनी कोर्ट मॅरेज केल्यानंतर एका मंचावर एकमेकांना वरमाळा घातल्या. अशात त्यांचा यादरम्यानचा अधिकृत व्हिडिओ अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) हिने कोर्ट मॅरेज (Court Marriage) समारंभातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत देवोलीना आणि शाहनवाज शेख (Shahnawaz Shaikh) हे दंडाधिकाऱ्यासमोर लग्नाच्या कागदपत्रांवर सह्या करताना दिसत आहेत. यानंतर दोघांनीही एकमेकांना अंगठी आणि वरमाळा घातल्या. या व्हिडिओवर नेटकरी प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत देवोलीनाने तिच्यासोबत नेहमी राहण्यासाठी शाहनवाजला धन्यवाद दिला आहे.

देवोलीनाने पती शाहनवाजसाठी लिहिला खास संदेश
देवोलीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “14.12.2022. फक्त प्रेम. जेव्हा कोणीही मी ठीक आहे की नाही, हे विचारण्याचे कष्ट घेतले नाही, त्यावेळी माझ्यासोबत राहण्यासाठी धन्यवाद शोनू. जसे मला हवे होते, तसे मला जाणवून दिल्याबद्दल धन्यवाद. प्रेम, सुरक्षा आणि काळजी करण्यासाठी धन्यवाद. सर्वात महत्त्वाचे माझा आदर करणे आणि मला माझ्या दोषांसह स्वीकारणे.” देवोलीनाने पुढे लिहिले की, “खूप काही सांगायचे आहे. मात्र, आतासाठी इतकेच. प्रत्येक गोष्टीसाठी खूप खूप धन्यवाद शोनू.” देवोलीनाने तिच्या या पोस्टमध्ये खूप जास्त हार्ट, प्रेम आणि आशीर्वादाचे इमोजी वापरले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

तिच्या या व्हिडिओवर नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. एकाने लिहिले की, “इतके पैसेवाले असूनही कोर्टात लग्न केले. इकडे आम्ही मध्यमवर्गीय असूनही लग्नात चिक्कार पैसा खर्च केला.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “अच्छा, तर स्वयंपाकघरात जिम ट्रेनर होता, आम्ही उगाच विशाल भाईवर संशय घेतोय.”

देवोलीनाचा वर्कफ्रंट
देवोलीनाच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर तिने आतापर्यंत ‘बिग बॉस’, ‘स्वीट लाय’, ‘सवारे सबके सपने प्रीतो’, ‘छोटी सरदारनी’ यांसारख्या अनेक शो, वेबसीरिज आणि मालिकांमध्ये काम केले आहे. (actress devoleena bhattacharjee court marriage with shahnawaz shaikh video viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! ट्रेंड होत असलेल्या ‘मेरा दिल ये पुकारे’ गाण्यावर अमिताभ 1999मध्येच थिरकलेले? पाहा व्हिडिओ
एकीकडे ‘भगव्या बिकिनी’चा वाद अन् दुसरीकडे सनीने समुद्रकिनारी केशरी रंगाच्या ड्रेसमध्ये दिल्या कामुक पोझ

हे देखील वाचा