जगातील सर्वच चित्रपटांसाठी ऑस्कर पुरस्कार हे सर्वात मोठे आणि मनाचे समजले जातात. चित्रपटांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुरस्कारांची सर्वच लोकं आतुरतेने वाट बघत असतात. हा पुरस्कार आपल्या चित्रपटाला मिळवा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते मात्र तो मिळवणे वाटते तितके सोपे नाही. ऑस्कर पुरस्कार हा त्या चित्रपटासाठी, चित्रपटाच्या टीमसाठी आणि त्या देशासाठी अतिशय मोठा सन्मान समजला जातो. मागील दोन वर्षांपासून ऑस्कर पुरस्कारांवर कोरोनाचे सावट होते, मात्र आता यावर्षी मोठ्या जल्लोषात हा सोहळा संपन्न होणार आहे.
सर्वच लोकं ९४ व्या ऑस्कर पुरस्करांची सर्वच लोकं आतुरतेने वाट बघत आहे. याच सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना आणि लोकप्रिय कलाकारांना पाहायची संधी मिळते. यावर्षी जेम कॅम्पियन यांच्या ‘द पावर ऑफ द डॉग’ या चित्रपटातला वेगवेगळ्या विभागांमध्ये सर्वात जास्त नामांकन मिळाले आहेत. या चित्रपटात बेनेडिक्ट कंबरबैच, जेसी पेलेमन्स आणि कर्स्टन डंस्ट आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. तर दुसरीकडे इंडियन डॉक्युमेंट्री सिनेमा असलेल्या ‘राइटिंग विद फायर’ सिनेमाने डॉक्युमेंट्री फिचरच्या विधागात आपली जागा तयार केली आहे.
येत्या रविवारी अर्थात २७ मार्च रोजी लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. तर या पुरस्कारांचे लाईव्ह प्रसारण भारतात सोमवारी केले जाणार आहे. लॉस एंजेलिसमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे प्रसारण तेथील वेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता केले जाणार आहे. मुख्य म्हणजे या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन यावेळी तीन तीन मोठे कलाकार करणार आहेत. एमी शूमर, रेजिना हॉल आणि वांडा साइक्स हे कलाकार हा सोहळा होस्ट करणार आहेत.
यावर्षीच्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘द पॉवर ऑफ द डॉग’, ‘ड्यून’, ‘बेल्फास्ट’ आणि ‘वेस्ट साइड स्टोरी’ या चित्रपटांना वेगवेगळ्या विभागांमध्ये सर्वात जास्त नामांकन मिळाले आहेत. ‘राइटिंग विद फायर’ या इंडियन डॉक्युमेंट्रीबद्दल सांगायचे झाले तर यात एका दलित महिला पत्रकाराने सुरु केलेल्या वृत्तपत्राची कथा दाखवण्यात आली आहे. या सिनेमाची टक्कर ‘एसेनशन’ ‘एटिका’ (Attica), ‘फ्ली’ (Flee) और ‘समर ऑफ सोल’ (Summer of Soul) सोबत होणार आहे. कोरोनामुळे तीन वर्ष हा पुरस्कार सोहळा झाला नव्हता. २०१८ नंतर यावर्षी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-