Wednesday, June 26, 2024

रेड कार्पेटवर दीपिकाच्या ‘या’ लूक्सने निर्माण केली दशहत, सादर करणार ऑस्कर अवाॅर्ड

ऑस्कर पुरस्कार 2023 ची ग्रॅंड सेरेमनी आज म्हणजेच रविवारी 12 मार्च रोजी होणार आहे. प्रथमच भारतातील एक सेलिब्रिटी हा पुरस्कार प्रेजेंट करणार आहे. या खास क्षणाची साक्षीदार होण्यासाठी बॉलीवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक दीपिका पदुकोण हिची निवड करण्यात आली आहे. या खास प्रसंगी दीपिकाचा ड्रेस आणि तिचा लूक पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. अभिनेत्रीच्या रेड कार्पेट लूकने नेहमीच लोकांची मने जिंकली आहेत. चला तर मग बॉलीवूड ब्युटी दीपिका पदुकोणच्या आतापर्यंतच्या रेड कार्पेट लुक्सवर एक नजर टाकूया.

कान्स 2022 मध्ये दीपिका पदुकोणच्या शानदार फ्लोर-लेंथ गाउनमध्ये बॅल्क आणि गाेल्डन पॅटर्न दाखवण्यात आला होता, ज्यामुळे तिला एक आलिशान आणि रीगल लुक देण्यात आला. तिचा हा लूक खूप छान दिसत होता. तिच्या मेकअपसाठी, दीपिकाने स्मोकी आय लूक आणि न्यूड-ब्राऊन लिप शेडची निवड केली हाेती, तर तिचे स्लीक शोल्डर-लेंथ केस तिच्या लुकला कंप्लीट करत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

दीपिका पदुकोणने कान्स 2022 मध्ये सब्यसाचीचा ड्रेस परिधान करून लोकांची मने जिंकली हाेती. तिने सब्यसाचीने डिझाइन केलेली ब्लॅक आणि सोनेरी रंगाची साडी परिधान करून रेट्रो लूक साकारला हाेता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

दीपिका पदुकोणने पुन्हा एकदा कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये गॉर्जियस रेड कार्पेट लूक परिधान केला आणि सिद्ध केले की तिचा रेड कार्पेट लूक काेणापेक्षाही कमी नाही. यावेळी तिने ऑरेंज रंगाचा गाऊन परिधान केला होता. जाे तिच्या सौंदर्यात भर घालत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

कान्स 2022 मध्ये, दीपिका अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेल्या साडीमध्ये दिसली होती. यावेळी सर्वांनी तिच्या लूकचे कौतुक केले.

दीपिका पदुकोणने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये इटालियन फॅशन हाऊस Giambattista Valli द्वारे सानुकूल-मेड लाइम ग्रीन रफल्ड गाऊनमध्ये एक आश्चर्यकारक लूक केला हाेता. यावेळी तिच्या या लूकची लोकांनी खूप प्रशंसा झाली.

कान्स 2018 साठी दीपिका पदुकोणचा गुलाबी रफल्ड गाउन लूक एक उत्कृष्ट शोस्टॉपर होता. अभिनेत्रीने आशी स्टुडिओचा कस्टम-मेड गाऊन परिधान केला होता, ज्यामध्ये ड्रामेटिक रफल्स होते. यावेळी अभिनेत्रीने आपल्या सुदंर लूकने सर्वांचे लक्ष वेधले हाेते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shaleena Nathani (@shaleenanathani)

दीपिका पदुकोणचा मेट गाला 2019 चा लूक खूपच बोल्ड आणि सुंदर होता, ज्यामुळे तिला या फंक्शनमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखले जाण्यास मदत झाली.(95th academy awards bollywood actress deepika creates panic with these red carpet looks will now present oscar award )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आजारातून उठल्यानंतर ‘सुश्मिता सेन’ हिने केले असे काही कृत्य की, प्रेक्षकही झाले थक्क; एकदा बातमी वाचाच

गायक आतिफ असलमची पत्नी आहे खूपच सुंदर, तिच्यापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही पडतील फिक्या

हे देखील वाचा