Friday, December 8, 2023

ऑस्कर सोहळ्यामध्ये दीपिका पदुकोण दाखवणार तिचा जलवा, दिसणार ‘या’ भूमिकेत

भारतीय मनोरंजनविश्वासाठी २०२३ हे वर्ष अतिशय अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे. यावर्षी संपन्न होणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये आतापर्यंत असे अनेक क्षण आले ज्यामुळे भारतीयांची मान उंच झाली आहे. एकीकडे ‘छेल्लो शो’ आणि ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ हे गाणे ऑस्करसाठी नॉमिनेट झाले आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री दीपिका पदुकोणदेखील ऑस्करसोबत जोडली गेली आहे. आता दीपिका आणि ऑस्कर कसे जोडले गेले याचा खुलासा दीपिकाने स्वतःच केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट करत सांगितले की, ती ऑस्कर पुरस्कारांमध्ये प्रेजेंटर म्हणून दिसणार आहे. तिच्या या बातमीमुळे सगळीकडेच आनंदाचे वातावरण आहे. दीपिकाचे फॅन्स आणि बॉलिवूडमधील स्टार्स या बातमीमुळे तिचे अभिनंदन करत आहे. तिच्या पोस्टवर रणवीर सिंगसोबतच नेहा धुपीणे देखील तिचे अभिनंदन केले आहे. दीपिका पदुकोणने तिच्या पोस्टमध्ये तिच्या व्यतिरिक्त कोण कोणते कलाकार प्रेजेंटर असणार आहे हे देखील सांगितले आहे. ड्वेन जॉनसन, माइकल बी जॉर्डन, जेनिफर कोनली, सॅम्युअल एल जॅक्सन, मेलिसा मेक्कार्थी, जो सलदाना, जोनाथन मेजर्स, क्वेस्टलव, डोनी येन यांच्यासोबत रिज अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, एरियाना डीबोस, जेनेल मोनाए, सॅम्युअल एल जॅक्सन देखील ऑस्कर प्रेजेंटर म्हणून दिसणार आहे.

दीपिका पदुकोणने कान्स आणि इतर परदेशातील चित्रपट महोत्सव गाजवल्यानंतर आता दीपिका तिचा जलवा ऑस्करमध्ये देखील दाखवणार आहे. १२ मार्चला अमेरिकेमध्ये होणाऱ्या या सोहळ्याची जोरदार तयारी चालू आहे. या सोहळ्याकडे भारतीयांचे लक्ष देखील लागले असून, एक, दोन नाही तर तब्बल ११ सिनेमे नॉमिनेटेड आहे. या सोहळ्यामध्ये ‘नाटू नाटू’ गाण्याचे गायक राहुल सिप्लिगुंज आणि काल भैरव ऑस्करमध्ये परफॉर्म देखील करणार आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रजनीकांत यांनी केली त्यांच्या १७० व्या चित्रपटाची घोषणा, टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित सिनेमात दिसणार थलाइवा

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान श्रद्धाबद्दल करण्यात आली नारेबाजी; चाहते म्हणाले, ’10 रुपयांची पेप्सी, श्रद्धा कपूर…’

हे देखील वाचा