Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

विमानतळावर दिसल्या बच्चन मायलेकी; आराध्याची उंची पाहून नेटकरीही म्हणाले, ‘ही लवकरच…’

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्‍चन आणि तिचा पती अभ‍िषेक बच्‍चन सोमवारी (दि. १८ जुलै) मुंबई विमानतळावर दिसले होते. दोघे आपली मुलगी आराध्‍यासोबत न्‍यूयॉर्कच्या व्हॅकेशनवरून परतत होते. ठीक १५ वर्षांआधी अभ‍िषेकने ऐश्‍वर्याला न्‍यूयॉर्कमध्येच प्रपोज क‍ेले होते. मात्र, सोशल मीडियावर विमानतळावरील व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये काही नवीनच पाहायला मिळाले. बच्‍चन परिवाराचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

विमानतळावरील व्हिडिओमध्ये ऐश्वर्या (Aishwarya Rai Bachchan) मुलगी आराध्यासोबत काळ्या रंगाच्या मॅचिंग ड्रेसमध्ये दिसत आहे. नेहमीप्रमाणे ऐश्वर्याने मुलीचा हात धरला आहे, पण यावेळी लोकांच्या नजरा व्हिडिओमध्ये ऐश्वर्यासोबत दिसणार्‍या आराध्याच्या उंचीवर गेल्या आहेत. ऐश्वर्या काळ्या रंगाच्या ड्रेससह काळ्या रंगाचा ओव्हरकोर्ट परिधान केला आहे, तर आराध्या काळ्या ट्रॅकसूटमध्ये दिसत आहे. दुसरीकडे, अभिषेक गुलाबी रंगाच्या हुडीमध्ये दिसला.

व्हिडिओमध्ये नेटकऱ्यांच्या लक्षात आले आहे की, आराध्याची उंची जवळजवळ तिच्या आईच्या बरोबरीची झाली आहे. एका युजरने लिहिले की, “आराध्या लवकरच तिच्या आईची उंची ओलांडणार आहे.’ तसेच, दुसऱ्या युजरने लिहिले, “आराध्या मोठी झाली आहे.” आणखी एका युजरने लिहिले की, “यांच्या मुलांची शाळा असते की नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नेहमीच आपले वैयक्तिक आयुष्य अतिशय खाजगी ठेवणाऱ्या ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी त्यांच्या सुट्टीचा कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. मात्र, अमजद अली खान यांचा मुलगा अयान याने या जोडप्यासोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकचे न्यूयॉर्कशी खूप खास नाते आहे. त्याच शहरातील हॉटेलच्या बाल्कनीत ‘गुरू’ चित्रपटाच्या प्रीमियरवेळी अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले होते.

ऐश्वर्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिचा ‘पोन्नियिन सेल्वन’ हा सिनेमा ३० सप्टेंबरला अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात ऐश्वर्या राय बच्चनसोबत चियान विक्रम, त्रिशा, कार्ती, जयम रवी, प्रकाश राज आणि शोभिता धुलिपाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चोल साम्राज्यावर आधारित या सिनेमाला ए. आर. रहमान यांनी संगीत दिले आहे. नुकताच त्याचा टिझर प्रदर्शित करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘वो तेरे प्यार का गम’, अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्याची चाहत्यांना भुरळ, तब्बल ‘इतक्या’ लोकांनी पाहिला व्हिडिओ

घटस्फोट झालेल्या समंथाला उचलून अक्षयने करण जोहरसमोरच फिरवले गरगर, व्हिडिओ पाहून ट्विंकलचाही चढेल पारा

अक्षय खन्नाच्या भावाच्या न्यूड फोटोची रंगलीय चर्चा; दिया मिर्झा म्हणतेय, ‘तुझा *** खूपच चांगला’

हे देखील वाचा