Tuesday, May 28, 2024

सौंदर्यामुळेच जुंपले विश्वसुंदरींमध्ये भांडण, अभिनेत्री ऐश्वर्या राय-सुष्मिता सेनमधील गाजलेला किस्सा

हिंदी सिने जगतात अनेक कलाकारांमध्ये वादाच्या ठिणग्या पडत असतात. ज्याच्या बातम्या नेहमीच माध्यमांमध्ये ऐकायला मिळत असतात. यामध्ये सर्वात जास्त वाद हे सिने जगतातील अभिनेत्रींमध्येच होतात. कधी कलाकारांच्या प्रेमप्रकरणाचे तर कधी ब्रेकअपचे किस्से चाहते चवीने ऐकत असतात. त्यामुळेच सिने जगतात असे अनेक गाजलेले किस्से आहेत ज्याची चर्चा नेहमीच होताना दिसत असते. अशीच चर्चा अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय यांच्यामधील वादाची झाली होती. काय होता नेमका तो गाजलेला किस्सा, चला जाणून घेऊ. 

अभिनेत्री ऐश्वर्या राय (aishwarya rai bachchan) आणि सुष्मिता सेन (sushmita sen) दोघीही बॉलिवूड मधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. आपल्या घायाळ करणाऱ्या सौंदर्याने दोघींनीही सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु दोघींच्या चित्रपटापेक्षा त्यांच्या एका गाजलेल्या किस्स्याचीच सर्वात जास्त चर्चा होताना दिसते. ही गोष्ट 28 वर्ष जुनी आहे, जेव्हा दोन्ही सुंदरी 1994 च्या मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. ऐश्वर्या ही स्पर्धा जिंकेल अशी सर्वांना पूर्ण आशा होती. हे अपेक्षित होते कारण त्याआधी तिने आंतरराष्ट्रीय सुपरमॉडेल स्पर्धा जिंकली होती आणि व्होगच्या अमेरिकन पर्वात दिसली होती. पण सुष्मिताने मिस इंडिया स्पर्धा जिंकून सर्वांनाच चकित केले.

मिस इंडिया स्पर्धेनंतर सुष्मिता सेनने केवळ मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले नाही तर मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. मात्र, ऐश्वर्या राय बच्चन हिनेही मिस वर्ल्डचा किताब पटकावला. तेव्हापासून दोघांमधील शीतयुद्धाच्या बातम्या समोर येत होत्या. 2004 मध्ये करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये सुष्मिता सेनने ऐश्वर्या राय बच्चनबद्दल सांगितले होते की तिच्यात आणि ऐश्वर्यामध्ये कोणताही वाद नाही. यासोबतच सुष्मिताने हा खुलासाही केला की, तिने स्वतःची कधीच ऐश्वर्याशी तुलना केली नाही. यासोबतच सुष्मिताने असेही सांगितले होते की, ऐश्वर्याही मिस इंडिया स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे कळताच तिने फॉर्म मागे घेतला. मात्र आईच्या प्रेरणेने तिने पुन्हा फॉर्म भरला होता. (know about controversy of sushmita sen and aishwarya rai bachchan)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
ललित मोदींच्या संपत्तीपुढे सुष्मिताची संपत्ती ‘पाणी कम चाय’, एका सिनेमासाठी आकारते फक्त ‘एवढे’ कोटी

व्हिडिओ: 18 वर्षीय सुष्मिता सेनचा खास व्हिडिओ व्हायरल, अभिनेत्रीच्या अंदाजाने जिंकली चाहत्यांची मने

हे देखील वाचा