Sunday, March 16, 2025
Home बॉलीवूड अरर! शाहरुख खानचा ‘हा ‘फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल, भडकले चाहते

अरर! शाहरुख खानचा ‘हा ‘फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल, भडकले चाहते

बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान (Sharukh Khan) बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे, पण लवकरच तो सोनेरी पडद्यावर दमदार कमबॅक करणार आहे. २०२३ हे वर्ष पूर्णपणे शाहरुख खानच्या नावावर असणार आहे कारण पुढच्या वर्षी एकामागून एक त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. शाहरुख पुढच्या वर्षाची सुरुवात ‘पठाण’ चित्रपटाने करणार आहे, त्यानंतर तो ‘जवान’मध्ये दिसणार आहे आणि वर्षाचा शेवट ‘डंकी’ने करणार आहे. मात्र, शाहरुखच्या दोन्ही चित्रपटांपेक्षा राजकुमार हिरानीच्या ‘डंकी’ चित्रपटाचीच जास्त चर्चा आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्या आधी एका व्हायरल फोटोमुळे शाहरुखचे चाहते चांगलेच संतापलेले दिसत आहेत. 

‘डंकी’च्या सेटवरील फोटो वायरल – अलीकडेच शाहरुख खान (shah rukh khan) मुंबई विमानतळावर लंडनला रवाना होताना दिसला. शाहरुख सध्या त्याच्या आगामी ‘डंकी’ (dunki) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, शूटिंगदरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. हा फोटो शाहरुख खानचा आहे. फोटोमध्ये शाहरुख खान चेक्स शर्ट आणि ब्लॅक पॅन्टमध्ये दिसत आहे. ‘डंकी’मधील शाहरुख खानचा लूक कसा असेल, हे आता या फोटोवरून स्पष्ट झाले आहे.

फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली. शाहरुखचे चाहते त्याच्या फोटोबद्दल विनंती करत आहेत की ते त्वरित हटवावे. खरंतर, त्याच्या चाहत्यांना असे लीक झालेले फोटो नको आहेत ज्यामुळे चाहत्यांचा उत्साह कमी होईल. यावर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले की, “कृपया ही पोस्ट ताबडतोब डिलीट करा.”  त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, “कृपया फोटो लीक करून लोकांचा उत्साह कमी करू नका,”

विशेष म्हणजे, १९ एप्रिल रोजी शाहरुख खानने राजकुमार हिरानीसोबतचा डंकी या आगामी चित्रपटाची घोषणा केली. दोघांनी एका व्हिडिओद्वारे ही घोषणा केली आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख संजय दत्तच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ (munnabhai MBBS) आणि आमिर खानच्या ‘पीके’ (PK)चे पोस्टर काळजीपूर्वक पाहताना दिसत आहे. त्यानंतर राजकुमार हिराणी तिथे पोहोचतात. यानंतर शाहरुख त्यांना त्याच्या नवीन चित्रपटात कास्ट करण्यास सांगतो आणि प्रकरण डंकीवर संपते.

हेही वाचा –

अंतराची कातील अदा अन नेटकरी झाले फिदा! अभिनेत्री योगिता चव्हाणच्या बोल्ड फोटोंनी लावले नेटकऱ्यांना वेड

विमानतळावर दिसल्या बच्चन मायलेकी; आराध्याची उंची पाहून नेटकरीही म्हणाले, ‘ही लवकरच…’

घटस्फोट झालेल्या समंथाला उचलून अक्षयने करण जोहरसमोरच फिरवले गरगर, व्हिडिओ पाहून ट्विंकलचाही चढेल पारा

 

हे देखील वाचा