Friday, April 19, 2024

अंतराची कातील अदा अन नेटकरी झाले फिदा! अभिनेत्री योगिता चव्हाणच्या बोल्ड फोटोंनी लावले नेटकऱ्यांना वेड

मराठी टेलिव्हिजनवर सध्या ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. ‘जीव माझा गुंतला’ मालिकेला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. त्यामुळेच मालिकेच्या कलाकारांचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. मालिकेत दाखवलेली अंतरा आणि मल्हारची आगळीवेगळी लवस्टोरी प्रेक्षकांना खूपच भावली आहे. त्याचबरोबर मालिकेतील प्रमुख नायिका योगिता चव्हाणचीही सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होताना दिसत असते. अशीच चर्चा तिच्या नवीन फोटोशूटची होताना दिसत आहे. 

अभिनेत्री योगिता चव्हाण ही मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार  अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या तिची जीव माझा गुंतला ही मालिका चांगलीच गाजत आहे. मालिकेतील योगिताने साकारलेली अंतराची भूमिका चांगलीच चर्चेत आली आहे. या भूमिकेतील तिच्या अभिनयाचे जोरदार कौतुक होताना दिसत आहे. त्याचबरोबर सध्या अंतराच्या नवीन फोटोशूटचीही सोशल मीडिया जोरदार चर्चा सुरू आहे.

 

 

आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन योगिताने हे फोटो शेअर केले आहेत. योगिताच्या या नवीन फोटोशूटमध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. योगिताने पोस्ट केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. या फोटोवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. याआधीही अभिनेत्री योगिता चव्हाणचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्याने तिच्या चाहत्यांना वेड लावले होते. दरम्यान अभिनेता योगिता चव्हाणने साथ तुझा भेटला, मुंबई आपली आहे, गावठी, शिवा अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यामधील तिच्या अभिनयाचे जोरदार कौतुक झाले होते.

हेही वाचा –

विमानतळावर दिसल्या बच्चन मायलेकी; आराध्याची उंची पाहून नेटकरीही म्हणाले, ‘ही लवकरच…’

‘वो तेरे प्यार का गम’, अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्याची चाहत्यांना भुरळ, तब्बल ‘इतक्या’ लोकांनी पाहिला व्हिडिओ

ढळला पदर खिळल्या नजरा! प्राजक्तानंतर मराठी अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

हे देखील वाचा