Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड ‘पच्चीस दिन में पैसा ट्रिपल’, अक्षयच्या सिनेमाच्या रिमेकचा बॉक्स ऑफिसवर धमाका, निर्मात्यांकडून कौतुक

‘पच्चीस दिन में पैसा ट्रिपल’, अक्षयच्या सिनेमाच्या रिमेकचा बॉक्स ऑफिसवर धमाका, निर्मात्यांकडून कौतुक

दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच २० मे, २०२२ रोजी रुपेरी पडद्यावर एक सिनेमा प्रदर्शित झाला होता. ९० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने कमाईचे विक्रम मोडीत काढले. तो सिनेमा दुसरा-तिसरा कोणता नसून ‘भूल भुलैय्या २‘ हा आहे. या सिनेमात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत होता. या सिनेमाला २ महिने उलटून गेले आहेत. या सिनेमाने केलेल्या यशस्वी कामगिरीनंतर संपूर्ण टीमने परदेशात जाऊन एकच जल्लोष केला. यानंतर आता अभिनेता कार्तिकने खुलासा केला की, ‘भूल भुलैय्या २’च्या अफलातून यशानंतर सिनेमाच्या निर्मात्यांनी त्याचे कौतुक केले.

अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) एका मुलाखतीत बोलताना म्हणाला की, “माझे निर्माते मला म्हणाले होते की, आता तू असा अभिनेता आहे, जो २५ दिवसात आमचे पैसे डबल करतो. माझे निर्माते खरोखर त्या विषयांमुळे खुश आहेत, जे मी निवडत आहे. तसेच, त्यांना कशाप्रकारची परतफेड मिळते. याबाबत मी खूपच खुश आहे. शेवटी, हा एक व्यवसाय आहे. आम्ही रचनात्मक पैलू घेऊन येतो. मात्र, शेवटी तुम्हाला पैसेही कमवायचे असतात आणि हे शेवटच्या निकालांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरतात.”

त्यांनी असा निष्कर्ष काढला की, ‘भूल भुलैय्या २’चे यश हे असत्य आहे आणि कुणीही सिनेमाच्या ब्लॉकबस्टर कमाईची अपेक्षा केली नव्हती. याचे सर्व श्रेय त्याने त्याच्या टीमलाही दिले. कार्तिक म्हणाला की, “कोणीतरी मला हे सांगितले आणि मला सकारात्मकतेने सांगायचे आहे की, ‘भूल भुलैय्या २’ (Bhool Bhulaiyaa 2) पाहिल्यानंतर अनेकांनी म्हटले की, ‘भूल भुलैय्या’ची आठवणही आली नाही. हे दोन्ही सिनेमांसाठी अभिमानास्पद बाब आहे.”

सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या २००७ मध्ये आलेल्या ‘भूल भुलैय्या’ या सिनेमाचा रिमेक असणाऱ्या ‘भूल भुलैय्या २’च्या कमाईबाबत बोलायचं झालं, तर या सिनेमाने एकट्या बॉक्स ऑफिसवर जगभरात २३० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली. यासोबतच कार्तिकचा हा सिनेमा ओटीटीवरही अव्वल क्रमांकावर ट्रेंड करत आहे. या सिनेमाला ग्लोबल ब्लॉकबस्टर ऑफ द ईयरदेखील घोषित केले जात आहे. या सिनेमात कार्तिकसोबत कियारा आडवाणी, तब्बू, राजपाल यादव यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन अनीस बज्मी (Anees Bazmee) यांनी केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिक आर्यनच्या आगामी सिनेमांबाबत बोलायचं झालं, तर तो ‘शहजादा’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रोहित धवन दिग्दर्शित करत असलेला हा सिनेमा सन २०२०मध्ये प्रदर्शित झालेल्या अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या ‘अला वैकुंठपुरमलू’ या तेलुगू सिनेमाचा रिमेक आहे. यामध्ये क्रिती सेनन ही अभिनेत्रीदेखील मुख्य भूमिकेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

प्रेग्नंट आहे की नाही? खरं काय ते ‘बेबो’ने एकदाचं सांगूनच टाकलं; म्हणाली, ‘उफ्फ! मी प्रेग्नंट…’

अमिताभसोबत काम करण्यासाठी थेट सिनेमाची निर्मिती करायला निघालेले, पण सलमानच्या वडिलांमुळे फिसकटलं गणित

‘तू बॉलिवूड हिरोसारखा सुंदर नाहीस’, म्हणत नसीरुद्दीन यांना गर्लफ्रेंडने दिलेला धोका; पुढं जे घडलं तो इतिहास

हे देखील वाचा