Saturday, September 30, 2023

अमिताभसोबत काम करण्यासाठी थेट सिनेमाची निर्मिती करायला निघालेले, पण सलमानच्या वडिलांमुळे फिसकटलं गणित

हिंदी सिनेसृष्टीच्या शतकीय कालखंडात अनेक प्रतिभावान कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने आणि त्यांच्या चार्मने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. प्रत्येक दशकात एक सुपरस्टार असे समीकरण उत्तम जमून आले होते. सिनेसृष्टीतील ६० आणि ७० चे दशकं गाजवणारे दिग्गज अभिनेते म्हणून राजेंद्र कुमार उर्फ ‘जुबली कुमार’ यांचे नाव घेतले जाते. १९६३ ते १९६६ या तीन वर्षाच्या काळात त्यांच्या चित्रपटांनी सलग सिल्वर जुबली साजरी केली. त्यामुळे प्रेक्षकांनी त्यांना प्रेमाने ‘जुबली कुमार’ हे नाव दिले.

दिलीप कुमार आणि नर्गिस यांच्या १९५० साली आलेल्या ‘जोगन’ चित्रपटात एक छोटी भूमिका साकारत त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, त्यांना खरी ओळख आणि प्रसिद्धी दिली ती १९५५ साली आलेल्या ‘वचन’ या सिनेमाने. सुमारे ८० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या राजेंद्र कुमार यांनी ६०च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमे दिले. मात्र, दुर्दैवाने ७० चे दशक उजाडत असताना त्यांचा चार्म कमी होऊ लागला. याचे कारण म्हणजे या दशकात राजेश खन्ना यांचा उदय झाला होता.

अनु कपूर यांनी राजेंद्र कुमारांबद्दल एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे, आपले बुडणारे करिअर सावरण्यासाठी राजेंद्र कुमार यांना अशा भूमिकेचा आणि सिनेमाचा शोध होता, जो त्यांच्या वयाशी मिळताजुळता आणि महत्वाचा, प्रभावशाली तर असेलच सोबत त्याच रोलमुळे त्यांना इंडस्ट्रीमध्ये टिकता देखील येईल. याच दरम्यान त्यांना समजले की, दिग्दर्शक चंद्रा बारोट एक चित्रपट बनवत आहेत, ज्याची कथा सलीम खान यांनी लिहिली आहे. हा सिनेमा होता ‘डॉन.’

‘डॉन’ बनवण्यासाठी सलीम खान आणि चंद्रा बारोट निर्मात्याच्या शोधात होते. त्यावेळी राजेंद्र कुमार यांनी समोर येत सलीम खान आणि चंदा बारोटसमोर ‘डॉन’च्या निर्मितीचा प्रस्ताव ठेवला. याच संदर्भात सलीम खान आणि चंद्रा बारोट यांनी राजेंद्र कुमारांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी बोलताबोलता सांगितले की, त्यांना या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याचा रोल निभावण्याची इच्छा आहे. किंबहुना त्यांनी ही अटच सलीम खान, चंद्रा बारोट यांच्यासमोर ठेवली.

राजेंद्र कुमार यांना ‘डॉन’ चित्रपटात अभिनेते इफ्तेखार यांनी निभावलेली भूमिका साकारायची होती. ही भूमिका द्यायला सलीम आणि चंद्रा यांना कोणतीच समस्या नव्हती. मात्र, राजेंद्र कुमार यांनी हा रोल वाढवण्यासाठी आणि अनेक सल्ले द्यायला सुरुवात केली, तेव्हा सलीम आणि चंद्रा निराश झाले, आणि तिथून बाहेर पडले. त्यावेळी सलीम म्हणाले, “हे काही जमणार नाही.” पुढे राजेंद्र कुमार यांच्या हातातून ही भूमिका आणि सिनेमा निर्मिती करण्याची संधी देखील गेली.

त्यांचे एकापाठोपाठ एक असे ३५ चित्रपट हिट झाले होते. त्यांना तीन वेळा फिल्मफेअरचे नॉमिनेशन दिले गेले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

शाहरुखच्या बंगल्यापेक्षाही जास्त संपत्तीचे मालक आहेत नसीरुद्दीन शाह, महिन्याला एक, तर वर्षाला कमावतात १२ कोटी

‘तू बॉलिवूड हिरोसारखा सुंदर नाहीस’, म्हणत नसीरुद्दीन यांना गर्लफ्रेंडने दिलेला धोका; पुढं जे घडलं तो इतिहास

सुष्मिताला ‘गोल्ड डिगर’ म्हणणाऱ्यांना एक्स बॉयफ्रेंड विक्रम भटांनी झाप झाप झापलं; म्हणाले, ‘ती जगातली…’

हे देखील वाचा